Home महाराष्ट्र बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. २३० च्या अध्यक्षपदी सुरेश मुटाटकर तर सरचिटणीसपदी...

बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. २३० च्या अध्यक्षपदी सुरेश मुटाटकर तर सरचिटणीसपदी प्रदिप कांबळे यांची नियुक्ती

290

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.27फेब्रुवारी):-सामाजिक,धाम्मिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे अग्रेसर असलेली अन् आदर्श शाखा पुरस्कार विजेती, बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.२३०,मुंबई सेंट्रलची सन २०२३ ते २०२६ या तीन वर्षाकरिता नवनिर्वाचित बिनविरोध कार्यकारिणी नुकतिच नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी गट प्रतिनिधी श्रीधर जाधव व शाखेचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुसागर सोसायटी मुंबई सेंट्रल येथे आयु.दिलीप उन्हाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बौध्दजन पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत सन २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. २३० च्या कार्यकारिणीची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.

सुरेश अनंत मुटाटकर अध्यक्ष, वसंत गणपत मोसमकर उपाध्यक्ष, प्रदिप पांडुरंग कांबळे सरचिटणीस,रविंद्र रामजी कांबळे चिटणीस,अक्षय सजन कांबळे खजिनदार, ऋषिकेश गौतम कदम संदेश वाहक तर गणपत कांबळे, बाळकृष्ण पाचलकर, रविंद्रनाथ सावंत, प्रभाकर कांबळे, विष्णू जावळे, कृष्णा नागरे,सजन कांबळे, प्रभाकर जाधव, अरविंद जाधव, दिलीप उन्हाळेकर, सुरेश सावंत अन् रविंद्र जाधव यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी सभागृहाच्यावतीने नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करुन, पुढील वाटचालीसाठी त्यांना सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here