Home महाराष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा

162

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.6फेब्रुवारी):-महाविद्यालयाचे दिवस संपले की प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र महाविद्यालयात आपण शिकलो, घडलो वेगवेगळ्या भागात विद्यार्थाबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले ती नाळ मात्र तशीच असते. पुन्हा एकदा भेटावे, सर्वांशी हितगुज करावे सर्वांनाच वाटते. पण प्रत्येकजन आपल्या नौकरी, धंद्यात, संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजसहजी शक्य होत नाही. मात्र ते अशक्यही नसते. सगळ्यांना भेटण्याची संधी मिळण्याच्या उद्देशाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करण्या-या आणि उत्तमोत्तम विद्यार्थांना घडविण्याची परंपरा असणा-या गाधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे सन १९७२ पासुन शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी गाधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, उदघाटक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अजाबराव वानखेडे, प्रमुख पाहुणे म्हणून गाधी सेवा शिक्षण समितीचे सचिव विनायकराव कापसे, सहसचिव नारायण डांगाले, कोषाध्यक्ष मारोतराव भोयर, सदस्य श्रीहरी गोहणे, कुसुमराव कडवे आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी माजी विद्यार्थी कृष्णा तपासे, बालाजी डाहुले, विजय बारापात्रे, घनश्याम चाफले, भानारकर, प्रकाश डायरे, मनोहर पोपटे, दिलीप शिरभैये, सुधाकर भलमे, अविनाश भटगरे, डॉ. अनिता माहावादीकर, लता लांडे, भावना बावनकर, धर्मराज धनोरे यांनी महाविद्यालयाच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी प्राचार्य डॉ. हरिचंद्र कामडी, प्राचार्य डॉ. जनार्धन काकडे, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे, चिमूर सोसायटीचे अध्यक्ष हेमराज दांडेकर यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड, संचालन प्रा. पितांबर पिसे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. हरेश गजभिये यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here