


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी (दि. 29 जानेवारी):- ब्रम्हपुरी शहराला लागूनच असलेल्या डोंगेघाट येथे 26 जानेवारीला आंघोळीकरिता गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 26 जानेवारीला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली. मात्र त्याचा मृतदेह शोधण्यासाठी तब्बल 48 तास शोधमोहीम राबवावी लागली.. प्राप्त माहितीनुसार मृतक दिपक शेळमाके (22) रा. धुम्मनखेडा वार्ड ब्रम्हपुरी हाआपल्या काही मित्रांसोबत डोंगेघाट येथे आंघोळीसाठी गेला.
मित्रांसोबत आंघोळ कररीत असताना दीपक खोल पाण्यात बुडाला मात्र याची कल्पना त्याच्या मित्रांना आली नाही. काही वेळाने सर्व पाण्याबाहेर निघाले मात्र दीपक निघालाच नाही. याची माहिती दिपकच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यांनी घटनेची माहिती ब्रम्हपुरी पो.स्टे. ला देण्यात आली असता पोलीस विभागाची टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व शोधमोहीम सुरू केली मात्र दीपकचा मृतदेह सापडलेला नसल्याने पोलिसांनी सलग 48 तास शोधमोहीम राबविली अखेर दोन दिवसांनी दिपक शेळमाके याचा मृतदेह पोलीसांना सापडला.
शोध मोहीमे नंतर सापडला मृतदेह…
गेल्या दोन दिवसापासून मोहीम सुरू होती त्यानंतर तब्बल 48 तासानंतर दीपक शेडमाके यांचा मृतदेह आढळून आला आहे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला अधिक तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.













