Home लाइफस्टाइल मौजे टाकळीकर यांचे “शोले स्टाईल” आंदोलन करून प्रशासनाला झुकवले

मौजे टाकळीकर यांचे “शोले स्टाईल” आंदोलन करून प्रशासनाला झुकवले

182

🔹आमरण उपोषण व आत्मदहन आंदोलन मागे

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 26 जानेवारी):-उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड यांच्या कार्यालयासमोर दिनांक रोज पासून सुरू असलेले आमरण उपोषण त्याचबरोबर आज आत्मदहन करण्याचा इशारा टाकळी येथील तरुणांनी दिला होता.

पण युवकांनी विचार करून आत्मदहन ऐवजी पाण्याच्या टाक्यावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन करून तिन्ही प्रशासनाला झुकविण्याचे काम केले.

दुपारी 4 वा च्या दरम्यान माहेश्वरी चौक उमरखेड येथे मोजे टाकळी येथील समस्त गावकरी यांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला गावाच्या रस्त्याची दखल घेण्यास भाग पडले.

तर आंदोलनकर्ते तरुणांनी पाण्याच्या टाक्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा पोलीस प्रशासनाचे अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना समजाऊन सांगून व तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या तर्फे लेखी स्वरुपाचे पत्र दिले आहे.

उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी शेकडो नागरिकांच्या व आंदोलनकत्यांच्या व पत्रकार बंधू यांच्या उपस्थित उपोषणकर्त्याच्या सर्व मागण्या मंजूर करून सविस्तर जाहीरपणे चर्चा करत अमोल येडगे (जिल्हाअधिकारी) साहेब यांना स्वतः फोनवरून सविस्तर माहिती सांगून सदर आमरण उपोषण मागे घेण्यास सांगितले.

व उपोषणकर्त्यांनी सदर अमरण उपोषण व आत्मदहन चे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी विजयराव खडसे (माजी आमदार), सरोज देशमुख मॅडम, आनंद देऊळगावकर (तहसीलदार) डॉ. व्यंकट राठोड (उपविभागीय अधिकारी) प्रदीप पाडावी (उपविभागीय पोलिस अधिकारी), अमोल माळवे (ठाणेदार) इत्यादी अनेक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी व त्याच बरोबर टाकळी गावातील व उमरखेड शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here