


✒️गोंदिया(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
गोंदिया(दि.28मे):-अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आंदोलनाची यशस्वी सांगता होताच संघटन विस्ताराच्या उद्देशाने महासंघामध्ये विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
आंदोलनानंतर आयोजित कार्यक्रमामध्ये संघटन अधिक मजबूत, व्यापक आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी दिगंबरजी बोपचे व मुकेश ओंकारलालजी नागपुरे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष पदी भूषण लोकीराम कावळे (माजी सरपंच, मोहाडी), नागेशकुमार मदनलाल बघेले व तिलकचंद चिंतामन बोपचे (हिराटोला) यांची निवड करण्यात आली.
याशिवाय गोंदिया जिल्हा महासचिव पदी डॉ. प्रकाश गुलाबचंद पटले (मा. सरपंच, चिल्हाटी) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा सहसचिव पदी मा. राधेश्याम गुनीलाल पटले यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये गणेश राहांगडाले यांची तालुका उपाध्यक्ष, सौ. दिपा राहांगडाले यांची उपाध्यक्ष (तालुका गोरेगाव), नरेंद्र पटले यांची तालुका सहसचिव, लोकेश राहांगडाले यांची तालुका कोषाध्यक्ष, मा. डागमलाल बिसेन यांची तालुका महासचिव, सौ. कुमारीका बिसेन यांची तालुका प्रसिद्धी प्रमुख, संजय येळे यांची तालुका प्रसिद्धी प्रमुख, सौ. सारिका येळे यांची जिल्हा महिला संघटन मंत्री तसेच दिलीपकुमार जियालाल डोमळे यांची सचिव, तालुका गोरेगाव पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्क, अधिकार आणि संघटन मजबुतीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. संघटन विस्ताराच्या या प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात महासंघ अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी नियुक्ती प्रक्रिया पार पडताना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. खुशालचंद्रजी बोपचे साहेब (माजी आमदार / खासदार, भंडारा लोकसभा क्षेत्र) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पारधी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ. अर्चना ताई चौधरी, गोंदिया जिल्हा अध्यक्ष व्ही. टी. पटले, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दत्तराजजी गौतम, तालुका अध्यक्ष योगेश्वरजी चौधरी आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.















