Home अमरावती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारक्रांतीतून आंबेडकरी कवितेचा जन्म- कवीसंमेलनाध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारक्रांतीतून आंबेडकरी कवितेचा जन्म- कवीसंमेलनाध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले

94

▪️परिवर्तनवादी आंबेडकरी कवीसंमेलनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.23मे):-“आंबेडकरी कविता केवळ रंजन करीत नाही तर व्यवस्थेच्या विरोधात असंतोष निर्माण करते.तिचा जन्मच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारक्रांतीतून झालेला आहे. “आम्ही जन्माला आलो आहोत क्रांतीचे अस्तर घेऊन

आमच्या रक्तातच आहे अन्यायाविरुद्ध पेटून उठणे.” हा तिचा बाणा आहे.आजच्या आंबेडकरी कवींनी वर्तमानातील शोषणाचे नवे चेहरे ओळखून त्यावर प्रहार केले पाहिजे.” असे विचार परिवर्तनवादी आंबेडकरी कवीसंमेलनाचे अध्यक्ष अभंगकार व परिवर्तनवादी कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी व्यक्त केले.

        ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीमटेकडी,अमरावती येथे नुकत्याच संपन्न झालेल्या चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी आंबेडकरी 

कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.

      भीमविचार मंचावरील सर्व मान्यवर कवींचा सत्कार सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन कवीसंमेलनाध्यक्ष प्रा.अरुण बा.बुंदेले तथा मुख्य संयोजक रमेशचंद्र कांबळे,शब्दाश्र प्रमुख प्रवीण काबळे,संयोजक प्रा.देवानंद पाटील, विद्रोही अविनाश गोंडाणे,चरणदास नंदागवळी,पद्माकर मांडवधरे, राजेश्वरी नंदागवळी यांनी केला.

   ” विद्रोहाची पडे ठिणगी

    वेदना होती निखारे,

    जीवन जगताना 

    येताच हे निखारे,

    बुद्ध – फुले – शाहू 

    आंबेडकरी विचारक्रांतीचे,

    वाहती मस्तकात वारे ॥ “

             विचारक्रांतीचे मस्तकात वारे का वाहतात ? हे सांगण्याचा प्रयत्न कवीसंमेलनाध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले यांनी “निखारे “या अध्यक्षीय कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला.

          कवी पद्माकर मांडवधरे यांनी 

” शिकवण माझ्या बाबाची ।

विसरू नका रे कोणी ॥

दाखवा एकीची शक्ती ।

शोभेल निळ्या ध्वजाची राजधानी ॥”

          “राजधानी” या कवितेतून त्यांनी एकीची शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला.

     कवी शिवा प्रधान रक्ताचे संदर्भ सांगताना म्हणतात की,   

      “रक्ताचे विविध संदर्भ

       रक्त घडवित असते ॥

       एक इतिहास शौर्याचा,

       पराक्रमाचा किंवा रक्त

       जिवदान देत असते  

       मरणाऱ्याला. ॥”

कवयित्री पल्लवी मते बाबासाहेबांची अमरगाथा गाताना म्हणतात की,

   ” शून्यातून केली सुरुवात ।

     अमर झाले इतिहासात ॥

     आंबेडकर असे त्यांचे नाव ।

     आपल्या सर्वांचे ते भीमराव ॥”

         कवयित्री प्रेरणा लक्ष्मीनारायण पांडे काळेखात वाट दाखवणाऱ्या बाबासाहेबांविषयी म्हणतात की,

“काळोख पसरेल आजूबाजूला तेव्हा कुठे – – 

विजांचा लखलखाट होतील बाबासाहेब॥

पश्चातापाने मिठ्या मारेल पिढी तुझी माझी ॥

मानवतेचे उजळ ललाट होतील बाबासाहेब ॥”

      कवी प्रा.निरंजन नवले “मी पाहिलेली माणसे” या कवितेत महामारीचे वर्णन करताना म्हणतात की ,

“मी पाहिलीत माणसे इथे,

शव दायीनित कोंबताना ॥

महामारीच्या काळात,

प्रेत सरणावर फेकताना॥”

    कवी ठवरे गुरुजी दोन संत या कवितेत म्हणतात की,

“विदर्भाच्या पुण्यभूमीत ।

 होऊन गेले दोनच संत ॥

एक ऋणमोचनात ।

दुसरे मोझरीत ॥”

कवी पवन अर्चना रमेश डोंगरे हवेत विधान करणाऱ्यांना संविधान कळले का? याविषयी म्हणतात की,

” चोरट्यांच्या या बाजारात,

 होतील अत्याचार माजेल तांडव ॥

 नुसती करती हवेत विधान,

 खरच कळले का हो,कुणाला संविधान!”

      कभी भास्कर बसवनाथे संविधानाविषयी म्हणतात की,

“अलग दिखती है उनकी यह चाल ॥

संविधान छिपाने की बन जायेगी ढाल ॥

विदेशी कौन है ,मूलनिवासी कौन है ॥

इतिहास साक्षी है यह सबको पता है ॥”

    कवी मयूर रवींद्र गायकवाड राजेंना जातीजातीत कसे वाटून घेतल्या गेले हे सांगताना म्हणतात की,

“श्री छत्रपती शिवाजी महाराज

हे नाव महाराष्ट्रातल्या मातीमातीत ।

अहो राजे तुम्हाला वाटून 

घेतले येथे जातीजातीत ॥”

      या परिवर्तनवादी आंबेडकरी कवीसंमेलनाचे बहारदार व काव्यमय संचलन प्रेरणा पांडे तर आभार पवन डोंगरे यांना मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here