Home महाराष्ट्र रुग्णसेवेला मानवतेची जोड देणारे अजय मराठे यांना“डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार...

रुग्णसेवेला मानवतेची जोड देणारे अजय मराठे यांना“डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026” जाहीर

56

✒️नाशिक(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नाशिक(दि.18मे):- “सेवा हीच खरी पूजा” या विचाराने सामाजिक व आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे आणि रुग्णसेवेला मानवतेची उब देणारे श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, नाशिक येथील Nursing Superintendent अजय केशरबाई भास्कर मराठे यांना प्रतिष्ठेचा “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026” जाहीर झाला आहे.

ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय व समाजहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि गरजू रुग्णांच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अजय मराठे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

रुग्णालयातील जबाबदारी सांभाळताना अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. “White Coat मागे फक्त कर्मचारी नसतात, तर कुणाच्यातरी आयुष्याची आशा उभी असते,” या भावनेतून त्यांनी केलेली सेवा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. 23 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता समुद्र लॉन्स, पौर्णिमा स्वीटजवळ, वावरेनगर, कामटवाडे, नाशिक येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा. आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, मा. अॅड. अमन आंबेडकर, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त भगवान वीर, अविनाश शिंदे, रमेश गायकवाड, नानासाहेब सावळे, सुधीर उमराळकर, दिनेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अजय मराठे यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे नाशिकच्या आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या मित्रपरिवार व चाहत्यांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हा पुरस्कार अधिक जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

“माणुसकी जपणारी सेवा हीच खरी समाजसेवा” या विचाराला न्याय देणाऱ्या अजय मराठे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here