Home महाराष्ट्र म्हसवड शहरातील वाहतूक कोंडीवर प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

म्हसवड शहरातील वाहतूक कोंडीवर प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

65

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.12मे):-म्हसवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असताना पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शाळा- कॉलेज रस्ते आणि चौकांमध्ये दिवसभर बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर उभ्या गाड्या आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रणासाठी ना कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी दिसतात, ना नगरपरिषदेकडून कोणती ठोस कारवाई होताना दिसते. शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन मात्र “झोपेचे सोंग” घेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये दिवसातून अनेक वेळा वाहतूक ठप्प होत असते. रुग्णवाहिका अडकण्याच्या घटनाही वाढल्या असून, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानासमोर कायमस्वरूपी पार्किंग केल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.

वाहतूक शाखेकडून केवळ अधूनमधून दंडात्मक कारवाई करून फोटोसेशन केले जाते; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे.

नागरिकांच्या मागण्या:

शहरात सम-विषम पार्किंग योजना तातडीने लागू करावी

मुख्य चौकांमध्ये कायमस्वरूपी ट्राफिक पोलीस नेमावेत

अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी

नो-पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी करावी

बसस्थानक आणि बाजारपेठ परिसरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी

म्हसवड शहराच्या वाढत्या विस्तारासोबत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र सध्या तरी “ना पोलीस गंभीर, ना नगरपालिका सक्रिय” अशीच परिस्थिती दिसून येत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

म्हसवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असताना पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शाळा- कॉलेज रस्ते आणि चौकांमध्ये दिवसभर बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर उभ्या गाड्या आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रणासाठी ना कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी दिसतात, ना नगरपरिषदेकडून कोणती ठोस कारवाई होताना दिसते. शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन मात्र “झोपेचे सोंग” घेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये दिवसातून अनेक वेळा वाहतूक ठप्प होत असते. रुग्णवाहिका अडकण्याच्या घटनाही वाढल्या असून, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानासमोर कायमस्वरूपी पार्किंग केल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.

वाहतूक शाखेकडून केवळ अधूनमधून दंडात्मक कारवाई करून फोटोसेशन केले जाते; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे.

*नागरिकांच्या मागण्या:*

*शहरात सम-विषम पार्किंग योजना तातडीने लागू करावी मुख्य चौकांमध्ये कायमस्वरूपी ट्राफिक पोलीस नेमावेत*

*अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी*

*नो-पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी करावी बसस्थानक आणि बाजारपेठ परिसरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी*

म्हसवड शहराच्या वाढत्या विस्तारासोबत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र सध्या तरी “ना पोलीस गंभीर, ना नगरपालिका सक्रिय” अशीच परिस्थिती दिसून येत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here