


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.10मे):-दिनांक 8 मे 2026 रोज शुक्रवारला सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी ता. ब्रम्हपुरी दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रम्हपुरी येथे विद्यार्थ्यांनी यावर्षी उत्कृष्ट यश मिळविले.
शाळेतील कु. त्रिशा मनोज रामटेके हिने 89.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर आनंद सुखदेव रामटेके याने 85.60 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर 84.60 टक्के गुण संपादित करून कु. तनुष्का प्रदीप मेश्राम हिने तृतीय क्रमांक पटकविला.
शाळेचा एकूण निकाल 81.25 टक्के लागला असून आमच्या डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी च्या वतीने आमचे आधारस्तंभ संस्थेचे संचालक अध्यक्ष आदरणीय डॉ. पि. आर. मेश्राम ,आदरणीय सचिव व्ही. पी.मेश्राम, आदरणीय कोषाध्यक्ष वाय. आर. मेश्राम तसेच आदरणीय सदस्या प्रा. एल. व्ही. मेश्राम तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे प्रवीण प्राप्त गुणसंपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तोंड गोड करून पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.















