Home महाराष्ट्र भारतीय राजकारणातील प्रेरणास्थान..फुले,आंबेडकरी विचारांचे वैचारिक वारसदार मा. कांशीराम

भारतीय राजकारणातील प्रेरणास्थान..फुले,आंबेडकरी विचारांचे वैचारिक वारसदार मा. कांशीराम

72

 बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचे मूळ नाव कांशीराम हरिसिंग रामदासीया चमार समाजातील असून 15 मार्च 1934 मध्ये पंजाब मधील रोपण जिल्ह्यात कांशीराम चा जन्म झाला. कांशीराम यांनी विज्ञान शाखेमध्ये बीएससी झाल्या नंतर पुण्यामध्ये नोकरी करीत असताना भारतीय संस्कृतीमधील विषमता लक्षात घेता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचारधारा ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित इन आय लेशन ऑफ कास्ट या पुस्तकातून प्रेरणा घेऊन त्यांनी बहुजन समाजाला राजकीय सत्ता मिळवून देण्यासाठी स्वतः अविवाहित सर्व जीवन बहुजन समाजासाठी समर्पित केले.

काशीराम विज्ञान शाखेतील विद्यार्थी असताना कोणतेही काम अशक्य नाही त्यामुळे त्यांनी बहुजन समाजातील वेळ बुद्धी आणि पैसा यांचे नियोजन संपूर्ण भारतभर सायकलद्वारे नियोजन करत बहुजन चळवळ यशस्वी केली . प्रस्थापित राजकारणा मध्ये फुले,आंबेडकर विचारधारा स्थान नसल्यामुळे कांशीराम यांनी पंजाब,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश व महाराष्ट्रातही वेळ दिला असून कांशीराम यांनी प्रथम 1978 मध्ये बामसेफ स्थापना करत फुले आंबेडकर विचाराची विचाराची पेरणी करत 1881 मध्ये (डी. एस-4)नावाची संघटना काढता दलित,शोषित, समाज, संघर्ष,समिती माध्यमातून देशभर आंदोलने केली. संपूर्ण भारतात प्रस्थापित राजकारणामध्ये बहुजन समाजाचे काही चालत नसल्यामुळे 1982 स*** ” चमचा युग ” नावाने पुस्तक प्रकाशित करत बहुजन समाजाचे नाव घेऊन काम करणारे नेते/पुढारी ओरिजिनल काम कुणाचे करतात हे पुस्तका मधून प्रकाशित झाले.बहुजन समाजातील नेते फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन प्रस्थापित पक्षांमध्ये कशासाठी..? कुणासाठी..? कशी राजकारण करतात हे कांशीराम यांनी आपल्या राजकीय प्रवासातून दाखवून दिले. बहुजन समाजाने शिक्षण, संघटन आणि फुले आंबेडकर विचार जनजागृती यावर भर देऊन प्रस्थापित पक्षातील परावलंबी राजकारण टाळावे असेही त्यांनी आपल्या विचार आणि आचरणातून व्यक्त केले.

 भारतीय राजकारणा मध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर ” होऊ शकत नाही ” ही संकल्पना मोडीत काढत भारत देशामध्ये फुले,शाहू, आंबेडकरी तत्त्वज्ञान यावर राजकारण होऊ शकते हे विचार आचारातून दाखवून दिले.

 भारतामध्ये सर्वात मोठे राज्य असलेले उत्तर प्रदेश यामध्ये 3 जून 1995 मध्ये बहुजन समाज पार्टीच्या बहन मायावती यांना मुख्यमंत्री करत पुन्हा 21 मार्च 1997 मध्ये दुसऱ्यांचा मुख्यमंत्री केले 3 मे 2002 तिसऱ्यांदा बहन मायावती यांना मुख्यमंत्री बनवत नंतर सामाजिक परिवर्तन करून पूर्ण बहुमताने 13 मे 2007 मध्ये मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवून दिला. प्रस्थापित राजकारणातील बहुजनवादी राजकारण मा. कांशीराम यांनी प्रयोगशाळा म्हणून उत्तर प्रदेशामध्ये करत असताना इतर राज्यामध्ये फुले आंबेडकरी विचारधारा यशस्वी होऊ शकते यासाठी बहुजन समाजाने फुले,आंबेडकर विचारधारा आचरणात आणून जागृत राहिले पाहिजे असा उपदेश दिला परंतु कालांतराने मान्यवर कांशीराम यांचा 9 ऑक्टोबर 2026 रोजी महापरिनिर्वाण झाले असता बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार दिल्ली येथे करण्यात आले. फुले, आंबेडकर तत्त्वज्ञान संपूर्ण भारतभर पेरणी करणारे मान्यवर कांशीराम यांना 15 मार्च जयंती देणे विनम्र अभिवादन..

✒️राहुल साबणे(पत्रकार-गंगाखेड)मो:-8149417161

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here