Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव ने सादर...

महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव ने सादर केलेल्या ” संगीत समर्पण ” या नाटकास चार पारितोषिके प्राप्त 

93

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.4मार्च 1६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसलेa संगीत नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत सांगली येथे स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव तर्फे मकरंद देशमुख लिखित आणि चिंतामण पाटील दिग्दर्शित ” संगीत समर्पण ” या नाटकास चार पारितोषिके प्राप्त झाली.

त्यात मकरंद देशमुख यांना लिखाणासाठी तृतीय पारितोषिक,सौ. प्राची चौधरी ( सत्यभामा ) यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र,कु. मयुरी हरीमकर ( रुख्मिणी ) हिला गायनाचे गुणवत्ता प्रमाणपत्र आणि सौ. नुपूर चांदोरकर-खटावकर यांना वेशभूषेसाठी प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

        सदर नाटकाची निर्मिती खान्देश नाट्य प्रतिष्ठान, जळगाव यांनी केली असून त्यात भुषण खैरनार ( सुत्रधार व कृष्ण ) कु.मयुरी हरीमकर ( नटी-१ व रुक्मिणी ) सौ.प्राची चौधरी ( नटी-२ व सत्यभामा ) संजय कुलकर्णी ( नारद ) कु. स्वाती डहाळे ( राधा ) आणि कुमार राम चौधरी ( बाळकृष्ण ) यांच्या भुमिका केल्या आहेत.

त्यांना साथसंगत राजेंद्र माने ( संवादिनी ) भूषण गुरव ( तबला ) दर्शन गुजराथी ( पखवाज,ढोलकी ) राजेश पुराणिक ( टाळ ) तंत्रज्ञ शरद भालेराव ( नेपथ्य ) पीयूष रावळ ( प्रकाशयोजना ) प्रबुद्ध भालेराव ( पार्श्वसंगीत ) सौ.मीनाक्षी पाटील रंगभूषा ) सौ.नुपूर चांदोरकर-खटावकर ( वेशभूषा ) सौ.मधुवंती देशमुख,सौ.रेणुका जोशी ( रंगमंच व्यवस्था ) ह्या बाजू सांभाळल्या. संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here