Home महाराष्ट्र मरायला हिंमत लागत नाही तर जगायला हिंमत लागते- सुप्रसिद्ध कवयत्री प्रा.डॉ. सुनिता...

मरायला हिंमत लागत नाही तर जगायला हिंमत लागते- सुप्रसिद्ध कवयत्री प्रा.डॉ. सुनिता बोर्डे-खडसे

81

✒️सांगोला(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सांगोला(दि.16फेब्रुवारी):– रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्याल सांगोलाचा जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुप्रसिद्ध कवयत्री व लेखिका प्रा.डॉ. सुनिता बोर्डे-खडसे म्हणाल्या कि जीवन जगत असताना मरायला हिंमत लागत नाही तर जगायला खूप हिंमत लागते. त्यांच्या ‘फिंद्री’ या सुप्रसिद्ध कादंबरी बद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. ‘फिंद्री’ म्हणजे नको असलेली मुलगी जीवन जगत असताना कसा संघर्ष करते व जीवनात कशी यशस्वी होते याचे खूप सुंदर वर्णन त्यांनी केले. आपण कितीही मोठे झालो तरी आई वडील व गुरूला कधीही विसरायचे नाही असे त्यांनी सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत(भैय्या) देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि तरुणांनी शिक्षण घेऊन आई, वडिलांची व समाज्याची सेवा करावी. तसेच बी.एस्सी (ए.आय) चे शिक्षण आपल्या महाविद्यलयात २०२६-२७ पासून चालू होणार आहे त्यामुळे मुलांनी सदर कोर्सची निवड करून आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर करावा.  

        जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख मराठी विभागाचे प्राध्यापक किसन पवार यांनी करून दिली. त्यानंतर महाविद्यलयाचे अहवाल वाचन ‘जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ’ कमिटीचे चेअरमन प्रा.अशोक कांबळे यांनी केले. अहवाल वाचनानंतर प्रमुख मान्यवरांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला त्यामध्ये प्रा. कोकरे बी.डी., प्रा.डॉ.सौ. सीमा गायकवाड, प्रा.डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा.अक्षय माने, प्रा.डॉ. किसन माने या प्रमुख गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला होता त्या प्रमुख स्पर्धांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

बौद्धिक स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ. रुपनर पी.जे. यांनी व मैदानी स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचलन प्रा.पवार व्ही.एम यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर, संस्थेचे संचालक मा.श्री. अवधूत कुमठेकर मालक, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेजचे प्राचार्य केशव माने, प्रा. संतोष खडसे व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. किसन पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.सौ.सिमा गायकवाड, प्रा.डॉ. मनोजकुमार माने व प्रा.शेख एन.एस. यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here