Home महाराष्ट्र विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांसोबत पालकांची भूमिका महत्त्वाची – अनुप कोहळे

विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांसोबत पालकांची भूमिका महत्त्वाची – अनुप कोहळे

127

▪️कुरुड येथे शालेय सांस्कृतिक महोत्सव संपन्न

✒️चामोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 चामोर्शी(दि.30जानेवारी):- विद्यार्थी हा देशाचा उद्याचा भविष्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे योग्य संस्कार व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविताना शिक्षकांसोबतच पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच उत्तम विद्यार्थी घडू शकतो, असे प्रतिपादन अनुप कोहळे यांनी केले.

चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुरुड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले की, ज्या प्रकारे कुंभार मातीला आकार देऊन सुंदर मूर्ती घडवितो, त्याचप्रमाणे विद्यार्थी हा मातीच्या गोळ्यासारखा असतो. त्या मातीला योग्य आकार देऊन सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे ही आजच्या काळाची गरज आहे.

या शालेय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन सरपंच विनोद मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भांडेकर होते. 

विशेष अतिथी म्हणून पूर्णचंद्र रायसिडम (अध्यक्ष, जंगल कामगार सोसायटी गडचिरोली) उपस्थित होते.

यावेळी उपसरपंच बाबुराव शेंडे, पोलीस पाटील यामिनीताई भोयर, प्रतिष्ठित नागरिक राकेश मुरकुटे, मुख्याध्यापिका सौ.अरुणा लांजेकर, राजीव गांधी शाळेचे मुख्याध्यापक माळवे सर, अश्विनीताई सातपुते, शिल्पाताई कन्नाके, भाग्यलक्ष्मीताई सोनटक्के, पुरुषोत्तम बोधलकर, दिशा भांडेकर, सचिन टेकाम, यशोदा आगेवार, जीवनलाल शेंडे, भैय्याजी सातपुते, यशोदाताई शेट्टीवार, अरुणा दैठे, गंगाधर मडावी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक, महिला, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here