Home महाराष्ट्र बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान-प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 20...

बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान-प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारीपर्यंत

190

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9423608179

चंद्रपूर(दि.30जानेवारी):-राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी 10 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते.

या योजनेअंतर्गत पात्र संस्थाकडून 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 6 मार्च 2026 आहे, असे प्र. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी सुभाष कुमरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here