Home चंद्रपूर सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

139

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.10डिसेंबर):-पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा चंद्रपूर अंतर्गत पशुसंवर्धन खात्यात दीर्घ काळ अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या 31 सहाय्यक गट विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहा.पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा चंद्रपूर चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारमूर्ती डॉ. वीरा कंकडालवार, डॉ. विनोद नंदगीरवार, डॉ. मारुती हरिणखेडे, डॉ. किशोर बनकर, डॉ. रिद्धीश पूस्तोडे, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, डॉ. प्रदीप पिपर शेट्टीवार, डॉ. दिलीप भुसारी, डॉ. विनय कांबळे, डॉ. पद्माकर वासनिक, डॉ. संजय एलमुले, डॉ. प्रकाश सहारे डॉ. अशोक भालेराव, डॉ. चारुलता पेंढारकर, डॉ. आयचित,डॉ. विनायक बेलसरे, डॉ सुभाष अकुलवार, डॉ. इंद्रपाल कुळमेथे, डॉ दिलीप येरमलवार, डॉ. संजय भालेराव, डॉ. भिकाराम अंबरकर, डॉ. विनाश गेडाम, डॉ. दुर्वास पराते, डॉ. कपिल वाळके, डॉ. बबन निमजे, डॉ. मयाराम इनवाते, डॉ. चंद्रकांत हेडाऊ हे होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ दत्ता नन्नावरे होते, तर उद्घाटक म्हणुन डॉ प्रवीण भुसारी , विशेष अतिथी म्हणून डॉ जगदीश बोढे, डॉ गुलाब लाडे, डॉ सुनील आलाम, डॉ जयंत खानेकर , डॉ रजनीकांत कन्मपल्लीवार, डॉ दिपक नागले डॉ अनंता अक्कोलखेडकर पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा चंद्रपूर चे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 31 सहाय्यक गट विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहा.पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना सत्कार मूर्ती म्हणाले की, “शेतकरी, पशुपालक आणि सहकाऱ्यांचे प्रेम व सहकार्य यामुळे आमचा सेवाकाळ फलदायी ठरला. विभागाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आम्ही नेहमीच जनावरांच्या आरोग्याला आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले.”

कार्यक्रमात 31 सत्कारमूर्ती यांच्या कार्याचा आढावा देताना मान्यवरांनी त्यांच्या सेवाभाव, समर्पण व कामातील काटेकोरपणाचे कौतुक केले. पशुवैद्यकीय शिबिरे, लसीकरण मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रमांमधील त्यांच्या नेतृत्वाची विशेष नोंद घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुनील आलाम केले. आभार प्रदर्शन डॉ जयंत खानेकर यांनी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेतर्फे करण्यात आले. तर संचालन डॉ प्रवीण पिदुरकर यांनी केले शेवटी सर्वांनी 31 सत्कार मूर्ती यांना निरोगी, आनंदी आणि सक्रिय सेवानिवृत्ती जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here