Home चंद्रपूर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राजुरा तर्फे पेन्शन जनक्रांती महामोर्चा संदर्भात जनजागृती

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राजुरा तर्फे पेन्शन जनक्रांती महामोर्चा संदर्भात जनजागृती

140

▪️प्रत्यक्ष कार्यालयीन कर्मचाऱ्यांना भेटून केली महामोर्चात उपस्थितीची विनंती

▪️जुनी पेन्शन फायटर धडकणार हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.9डिसेंबर):-1982- 84 ची जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करणे या आपल्या हक्काच्या मागणीसाठी पेन्शन जनक्रांती महामोर्चा येत्या 12 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथील विधान भवनावर लाखोंच्या संख्येने धडकणार आहे. यासंदर्भात राजुरा तालुका महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय महसूल विभाग, कृषी विभाग, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, ॲड यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय, गोपिकाबाई सांगाडा पाटील आश्रम शाळा, पंचायत समिती कार्यालय, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, शिवाजी हायस्कूल राजुरा, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा शाळेसह अनेक आस्थापना यांना प्रत्यक्ष भेटी देऊन येणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चाला मोठ्यासंखेने सहभागी होण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी महेश गोरे, तालुका अध्यक्ष, गणपत चव्हाण, सचिव, सुरेंद्र दारवटकर, कार्याध्यक्ष, जगदीश घोटकर, उपाध्यक्ष, रामेश्वर नागरे, कोषाध्यक्ष, सुधीर झाडे, सल्लागार, सिद्धेश्वर लटपटे, मनोज काकडे, संदीप बोबाटे, रूपेश चिडे, बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा( निवृत्ती वेतन) नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) 1984 तसेच भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) सह लागू करणे ही आहे . कर्मचाऱ्यांना सरकारची प्रस्तावित राज्य सरकारची सुधारित निवृत्तीवेतन योजना RNPS/केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना UPS मान्य नाही. राज्यात जुन्या पेन्शन ऐवजी आरएन पीएस , यूपीएस किंवा अन्य कोणतीही योजना आणणे किंवा लागू करणे हे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतर भविष्य उध्वस्त करणे होईल.

त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयी रोष वाढत जाणार आहे. त्यामुळे शासनाला जागी करण्यासाठी डीसीपीएस, आरएनपीएस , युपीएस सारख्या फसव्या योजना कर्मचाऱ्यांवर न लागता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना म.ना.से. अधिनियम 1982 व 84 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याचा निर्णय घ्यावा. यासाठी राज्यातील लाखो कर्मचारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर पेन्शन जनकार क्रांती महामोर्चा करत आहे. त्यात राजुरा तालुक्यातील पेन्शन फायटर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here