Home महाराष्ट्र ने.ही. माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय ब्रह्मपुरी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

ने.ही. माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय ब्रह्मपुरी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

138

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. डिसेंबर):-नेवाजाबाई हितकारिणी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रह्मपुरी येथे विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधून एक भव्य व गौरवशाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय संविधान निर्मात्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के.एम. नाईक सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री. एन.डब्ल्यू. नाकाडे सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री. पि.आर. जीभकाटे सर, ज्येष्ठ शिक्षक वदनलवार सर आणि ज्येष्ठ शिक्षिका मराठे मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मौन पाळून अभिवादन करण्यापासून झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या कार्य, विचार आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारी मनोगते सादर केली.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

गीतगायन स्पर्धा भाषण स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा

या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक संदेशावर आधारित कलाकृती, भाषणे आणि सादरीकरणे सादर करून कार्यक्रमाला विशेष उंची दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निशिकांत बोरकर सर यांनी अतिशय प्रभावीपणे केले, तर उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार श्री. सिंदीमेश्राम सर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here