


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : – मागासवर्गीय महामंडळ कर्जवितरण तक्रार निवारण समितीची सांगली जिल्ह्यातील बैठक लवकरच होणार असून यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हा आणि या जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे समितीमध्ये काम करणारे इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते पत्रकार परिषदेत केले आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी सांगली येथील आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी बोलताना विश्वास मोहिते म्हणाले, मागासवर्गीय महामंडळ यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ , महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ याचबरोबर मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय समाजासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी शिफारस करणारी महामंडळ असते. या महामंडळातून कर्ज पुरवठा करताना किंवा कर्जासाठी बँकेकडे शिफारस करताना काही प्रमाणात अडवणूक केली जाते तर ती प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकेत पाठवल्यानंतर मात्र बँकेतून बहुतांश प्रकारे अडवणूक केल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा अडचणी विरुद्ध संघर्षासाठी या समितीची स्थापना करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी तसेच पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारिणी स्थापन करण्यात आलेली आहे. आता जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असून सातारा जिल्ह्यातील बऱ्यापैकी समिती स्थापन झालेली आहे. त्यामुळे आता सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील समिती गठीत करण्याचे काम सुरू असून सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांनी विश्वास मोहिते संस्थापक अध्यक्ष संविधान सदन पाडळी केसे, पोस्ट सुपने, तालुका कराड, जिल्हा सातारा या पत्त्यावर किंवा मोबाईल नंबर 97 63 20 10 56 वरती संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.














