Home महाराष्ट्र गंगाखेडची सुपर वूमन स्त्रीशक्तीचा अद्वितीय सोहळा सपन्न.

गंगाखेडची सुपर वूमन स्त्रीशक्तीचा अद्वितीय सोहळा सपन्न.

403

प्रतिनिधी(अनिल साळवे, 8698566515) भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गंगाखेड येथे महिलांसाठी आयोजित “कोण होणार गंगाखेडची सुपर वूमन?” ही भव्य आणि ऐतिहासिक स्पर्धा अतिशय थाटामाटात, उत्साह आणि आनंदमयी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांची कलागुण, विचारसंपदा, आत्मविश्वास, ऐतिहासिक व सामाजिक जाणीव जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. आजच्या स्त्रीशक्तीला भूतकाळातील महान स्त्रियांच्या कार्यातून प्रेरणा देणे, तसेच प्रत्येक घराघरात स्त्रीशक्तीचे सामर्थ्य ओळखले जावे याकरता हा कार्यक्रम मोठ्या दृष्टीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मान्यवर जज म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. गोपी मुंडे सर, तसेच API सौ.दीपाली गित्ते मॅडम व सौ.ज्योतीताई मुद्गलर यांनी परीक्षकांची जबाबदारी पार पाडली. परीक्षकांनी केवळ व्यक्तिमत्त्व सादरीकरण नव्हे तर स्पर्धकांचे सामान्य ज्ञान व प्रश्नोत्तर यावरूनही परीक्षण केले.
या स्पर्धेत गंगाखेड व परिसरातील तब्बल २५ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध ऐतिहासिक आणि देवीस्वरूप व्यक्तिमत्त्वांचे रूप साकारले. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजामाता, राणी पद्मावती, सुनीता विलियम्स, जनाबाई, हिरकणी, काली माता,लता मंगेशकर अशा अजरामर व्यक्तिमत्त्वांची आणि देवीस्वरूपांची जिवंत झलक प्रेक्षकांसमोर उभी करण्यात आली. प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांना थक्क केले, तर महिलांच्या आत्मविश्वासाने सभागृह दणाणून गेले.
स्पर्धेत केवळ अभिनय आणि वेशभूषाच नव्हे, तर परीक्षकांनी स्पर्धकांचे सामान्य ज्ञान व प्रश्नोत्तरे घेऊन त्यांच्या बौद्धिक क्षमतेचीही कसोटी पाहिली. यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
याशिवाय प्रेक्षकांसाठीही क्विझ कॉन्टेस्ट आणि लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी आणि उपस्थित नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे कार्यक्रमात केवळ स्पर्धकच नव्हे, तर प्रत्येक प्रेक्षक हसतमुख आणि सहभागी राहिला.
या भव्य स्पर्धेत विजेती म्हणून सौ. सुवर्णमाला मोतीपवळे यांना मानाचा किताब मिळाला,तर उपविजेती सौ.श्रद्धा बोरफळकर ठरल्या. विजेत्या स्पर्धकांना उमदेवर, पैठणी, ट्रॉफी, सन्मानपत्र आणि भर्गोस बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व सहभागी महिलांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन त्यांच्या योगदानाला दाद देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आकर्षक, दर्जेदार आणि प्रभावी संचालन पूजा दर्डा यांनी केले. त्यांच्या प्रभावी निवेदनाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.
या उपक्रमाचे मुख्य आयोजन बी.के.बी.सी. ट्रस्टच्या सचिव सौ. मंजुताई दर्डा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी पार पडण्यासाठी सौ. मंगल अच्छा, श्री. सिद्धार्थ दर्डा, शुभम अच्छा, ऋषभ दर्डा, अमर करंडे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांचे योगदान आणि समर्पणामुळे हा कार्यक्रम भव्यतेने साकार झाला.
कार्यक्रमास महिला वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला. गंगाखेड आणि आसपासच्या भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची,आत्मविश्वासाने स्वतःला मांडण्याची आणि समाजात प्रेरणादायी ठरण्याची संधी मिळाली.
बी.के.बी.सी. ट्रस्टचे पदाधिकारी म्हणाले की, अशा उपक्रमांतून स्त्रियांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. “स्त्री हीच खरी युगनिर्माती आहे. तिच्यातील सामर्थ्य व संस्कार पुढच्या पिढ्यांचे भविष्य घडवतात. त्यामुळे स्त्रियांच्या प्रत्येक योगदानाला मान देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.” असे यावेळी सांगण्यात आले.
या भव्य उपक्रमामुळे गंगाखेडमध्ये स्त्रीशक्तीचा एक अद्वितीय सोहळा अनुभवायला मिळाला. “कोण होणार गंगाखेडची सुपर वूमन?” या स्पर्धेने प्रत्येक महिलेला अंतःकरणातून स्पर्श केला व समाजमनावर एक अविस्मरणीय ठसा उमटवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here