Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये नवागतांचा स्वागत समारंभ संपन्न

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये नवागतांचा स्वागत समारंभ संपन्न

196

कराड – विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये येण्यापूर्वीच्या कल्पना भिन्न- भिन्न असतात. सिनेमातले कॉलेज विश्व हे निराळेच असते. मात्र आपल्या कॉलेजचे विश्व वर्गात, ग्रंथालयात व मैदानात दडलेले आहे ते शोधा. अभ्यासाबरोबरच मेहनत करा,चांगले मार्गदर्शन घ्या व व्यक्तिमत्त्वाचा विकास करा असे विचार मा. प्रभारी प्राचार्या डॉ.एस.आर.सरोदे यांनी मांडले.
वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथील अकरावी कला, वाणिज्य व व्यावसायिक अभ्यासक्रम मध्ये प्रवेश घेतलेल्या “नवागतांचे स्वागत” समारंभ वेळी त्या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या विद्यार्थी हे कौशल्यानुसार क्षेत्र निवडू शकतात.कला व वाणिज्य या शाखांमध्ये सुद्धा भरपूर संधी आहेत. यासाठी चांगले मित्र निवडा कारण मित्र-मैत्रिणींच्या नात्यातही मर्यादा आहेत.
यावेळी उपप्राचार्य आर.ए. कांबळे यांनी आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलेचे कौतुक केले जाते. विद्यार्थ्यांनी अध्यापनाचा, मैदानाचा व अभ्यासिकेचा पुरेपूर लाभ घ्यावा.आजच्या युगात बुद्धिमत्ता सांभाळणे काळाची गरज आहे. खरेखुरे ज्ञान हे पुस्तकात दडलेले आहे.ते मोबाईलमध्ये लपलेले नाही. भविष्यकाळ सुखाचा करण्यासाठी वर्तमान काळातच काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी पर्यवेक्षिका एस. एस. मधाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक श्रीमती एन. एच. जाधव यांनी केले. महाविद्यालयातील प्रशासकीय व जिमखाना समित्यांच्या निमंत्रकांनी विद्यार्थ्यांना सेवा, सोयीसुविधा व योजनांची माहिती करून दिली.श्री के. एस. महाले यांनी आभार व्यक्त केले. कुमारी रिया कदम हिने सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास शिक्षक व विध्यार्थी-विध्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here