


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारे 06.15 वाजता पळशी, ता. माण, जि. सातारा येथील पिराची टेकडी देवीच्या मंदिराजवळील रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडला. गावातीलच बाळाबाई दत्तात्रय गंबरे (वय 68) व लताबाई हनुमंत खाडे (वय 60) या दोन महिला मॉर्निंग वोकला जातं असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या INTRA पिकअप ने त्यांना जोरदार धडक दिली यां मध्ये एक महिला जखमी झाली असून एका महिलेचा मृत्यू झाला यां घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अज्ञात चालकाने वाहन हयगईने, अविचाराने व निष्काळजीपणे चालवून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अपघात केला. धडकेनंतर वाहनचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात बाळाबाई गंबरे यांचा जागीच मृत्यू झाला असून लताबाई खाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या घटनेबाबत प्रकाश नाना खाडे (वय 48, रा. पळशी, ता. माण) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 अन्वये BNS 106(1), 106(2), 281, 125(A), 125 (B), तसेच MV Act 184, 134(A) (B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास सपोनि. अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत. सदर घटनेतील आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.














