


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग असून याची कुणीही मागणी केलेली नाही. असे असताना हजारो शेतकऱ्यांच्या बागायती शेती उद्ध्वस्त करून शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करून हा महामार्ग रेटण्याचा राज्य सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी.. सांगली जिल्ह्यातील कवलापूर व इतर गावातील बाधीत शेतकऱ्यांनी दीड वर्षापूर्वी संपूर्ण 12 जिल्ह्यातील 350 पेक्षा जास्त गावात जाऊन शेतकऱ्यांना एकजूट करून भाई दिगंबर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला आहे.. गेली दीड वर्षापासून अनेक मेळावे विविध आंदोलने , उपोषणे, सातत्याने करून शेतकऱ्यांना एकजूट करून शक्तिपीठ महामार्ग रद्द चा लढा मजबुत केला आहे.. सांगली जिल्ह्यातील बाधीत गावात सुरू असलेली मोजणी प्रचंड विरोध करीत, काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांना वावरातून हाकलून काढून तर काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांच्या समोर बोंबाबोब आंदोलन केले तसेच दांडकी हातात घेऊन सावळज येथे शासनाचा निषेध केला..
सांगली जिल्ह्यातील मिरज तासगाव कवठे महांकाळ तालुक्यातील अनेक बाधीत गावातील लढवय्या बाधीत शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करीत मोजणी अधिकाऱ्यांना वावरा पर्यंत न येऊ देता चावडीत लिखित नकार देऊन पंचनामा करण्यास भाग पाडले.. अशा सर्व लढवय्या बाधीत शेतकऱ्यांनी. भारतीय स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सावळज येथील सिध्देश्वर ग्रेप ग्रोअर्स स्टोअरेज एमएसईबी रोड येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द साठी आरपार च्या लढ्याची पुढील दिशा ठरविणे साठी मेळावा आयोजित केला आहे अशी माहिती नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण दिली..
मेळाव्याच्या तयारीसाठी कवलापूर येथे शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली
यावेळी जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, भूषण गुरव, विष्णु सावंत, राहुल जमदाडे, शिवाजी शिंदे, वामन कदम, बाळासाहेब लांडगे, गजानन पाटील, प्रकाश टकले, सिध्देश्वर जमदाडे, गजानन सावंत व इतर बाधीत शेतकरी उपस्थित होते.














