


नागेश खुपसे-पाटील
( सोलापूर जिल्हा प्रतिनिधी, मो. 77750 96293)
सोलापूर: लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज (२६ जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (वय अंदाजे ३५) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. बॉयलरच्या एअर प्री-हिटरमध्ये वाढलेल्या दाबामुळे अचानक झालेल्या स्फोटात ही दुर्घटना घडली.
घटनेच्या वेळी समीर खेडेकर हे संबंधित यंत्राजवळ एकटेच कार्यरत होते. स्फोट इतका जोरदार होता की त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तत्काळ सहकाऱ्यांनी त्यांना लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी कामथ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघाताबाबत कंपनीचे एचआर मॅनेजर सचिन खरे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “या घटनेची सखोल चौकशी कंपनीमार्फत तातडीने सुरू करण्यात आली आहे.














