


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : शिंगणापूर – म्हसवड मार्गावर असणाऱ्या वरकुटे-म्हसवड या गावातील शंभर हून अधिक विद्यार्थी शिक्षणांनिमित्त म्हसवड येथे ये जा करीत असतात. मात्र शालेय वेळेनुसार त्यांना बस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत असून शालेय वेळेनुसार सदरची बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल माने यांनी एस टी आगार व्यवस्थापक दहिवडी यांच्याकडे केली होती.शैक्षणिक व आर्थिक झळ विद्यार्थ्यांना सोसावी लागत असल्याने अमोल माने यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठ पुरावा केला होता.
वरकुटे म्हसवड येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकाऱ्याने व सामाजिक कार्यकर्ते अमोल माने यांच्या पाठपुराव्यामुळे आज सकाळी ठीक ९.०० वाजता वरकुटे म्हसवड येथे नव्याने सुरू झालेल्या म्हसवड ते शिंगणापूर (दिवसातून तीन फेऱ्या) बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी ग्रामस्थानी एस. टी विभागाचे आभार मानले.
यावेळी उपस्थित एस. टी कर्मचाऱ्यांचे वरकुटे पंच क्रोषीतील नागरिक, विद्यार्थी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे म्हसवड मंडळ अध्यक्ष प्रशांत गोरड, अमोल माने ,काकासो माने, सुभाषबापू माने , महावीर बनसोडे, शिवाजी माने , आबाजी ठेंगील, श्री दुर्योधन माने, महादेव माने , अशोक गोरड, सुनील माने, सुभाष जाधव, रघुनाथ माने,नितीन मोटे, सुनील करे, सचिन जाधव, नवनाथ माने, अभिजीत माने, दशरथ चव्हाण, मेहबूब मुलानी, विठ्ठल बनसोडे, अरविंद माने, विलास लोखंडे , आबासो बनसोडे, अंकुश माने , केशव काटकर, दीपक काटकर, बाबासो बनसोडे, ईश्वर इंगळे, पंकज शिलवंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














