Home महाराष्ट्र दहिवडी शहरात महिलांसाठी मुताऱ्या बांधा ; अन्यथा तीव्र आंदोलन करू! महिला अधिकार...

दहिवडी शहरात महिलांसाठी मुताऱ्या बांधा ; अन्यथा तीव्र आंदोलन करू! महिला अधिकार परिषदेचा नगरपंचायतीस इशारा!

347

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा ) : दहिवडी शहरातील मुख्य चौकामध्ये महिलांसाठी मुताऱ्या बांधाव्यात यासाठी यासाठी गेली चार वर्ष मागणी व पाठपुरावा करून सुद्धा अदयाप काम झालेले नाही तरी तातडीने याबाबत कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला अधिकार परिषदेच्या वतीने दहिवडी नगरपंचांयतीस निवेदनद्वारे देणेत आला आहे
निवेदनात म्हटले आहे की, दहिवडी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून मोठी बाजारपेठ आहे, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये दहिवडी या ठिकाणी असून राष्ट्रीयकृत बँका दहिवडी या ठिकाणी आहेत, शासकीय कामे, बाजार खरेदी विक्री, बचत गटांची कामे यासाठी महिला तालुक्याच्या विविध भागातून येत असतात परंतु शहरामध्ये कोठेही महिलांसाठी मुतारी नसलेने महिलांची खुप कुचबना होतं असते त्याचा परिणाम आरोग्यावर होतं आहे तरी शहरातील बाजारपेठ, मायणी चौक, फलटण चौक इत्यादी सर्वच आवश्यक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुस्थितीतील मुताऱ्या बांधाव्यात ज्या स्टील मटेरियल मध्ये असाव्यात तात्पुरत्या स्वरूपाच्या नसाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
यावेळी महिला अधिकार परिषदेच्या अध्यक्षा भारती चंद्रसेन पवार, पुष्पा भुजबळ, राणी अवघडे, कल्पना खरात, मिनाज शेख,माधुरी सुतार, नीता गोळे, वर्षा गुरव, सिंधुताई यादव, उज्वला नवले, ज्योती मिसळे, शीतल मिसळे, वैशाली चव्हाण, आशाताई गोसावी,दीपाली गायकवाड, अंजली अवघडे, गौरी अवघडे, पुष्पा यादव, सुषमा यादव, संगीता माने यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here