Home महाराष्ट्र गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मलठण विद्यालयात 13 वर्षांनी...

गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मलठण विद्यालयात 13 वर्षांनी रंगला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

152

 

 

दौंड – सन 2012 साली इयत्ता दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तब्बल 13 वर्षांनी माजी विद्यार्थी स्नेह संमेलन आयोजित केले होते.
या कार्यक्रमास बॅच 2012 च्या विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे प्रतिसाद दिला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरवात केली,

यावेळी शाळेतील 50 विद्यार्थी उपस्थित झाले होते. प्रथम विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून भेटवस्तु दिल्या, यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना कोणी प्रगतशील शेतकरी आहे म्हणून सांगितले तर कोणी प्रशासकीय क्षेत्रात नोकरी करत असल्याचे सांगितले, तर कोणी आयटी कंपनी मध्ये काम करत आहे तर कोणी छोटा मोठा व्यवसाय करत आहे म्हणून सांगितले, म्हणून सांगितले तर मुलींनी आम्ही एक उत्तम गृहिणी म्हणून काम करत असताना सुद्धा स्वत चे व्यवसाय महिलांसाठी ब्युटी पार्लर क्षेत्रात तर कोणी डिझायनर तर कोणी बचत गटात काम करत आहे म्हणून सांगितले,
ही सर्व प्रगती पाहून उपस्थित शिक्षकांनी भरभरून कौतुक केले,
उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना शेती हाच व्यवसाय चांगला आहे, एक दिवस शेतकऱ्याचाच येईल असे सांगितले, तसेच मलठण गावचे सुप्रसिद्ध होम मिनिस्टर निवेदक नितीन देसाई यांनी उपस्थित राहून विविध खेळ घेतले, विद्यार्थ्यांचे खूप मनोरंजन केले, खेळातून प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या, सकाळी 10 वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता संपला.
एकत्र बेंच वर बसलेल्या आठवणी जाग्या केल्या, जुन्या आठवणींना उजाळा दिला , यात कसा दिवस संपला समजलेच नाही, कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन सुप्रसिद्ध लावणी शो निवेदक श्री. राम जगताप यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here