


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : पांदवाट कविता संग्रह ,पाऊलवाट कथासंग्रहच्या माध्यमातून दुष्काळ ग्रस्तां चे जीण आपल्या साहित्यातून हुबेहूब मांडून लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं सामाजिक कार्य करणारे साहित्यिक लक्ष्मण हेंबाडे यांनी देवापूर ला सदिच्छा भेट दिली. यावेळी देवापूर चे सरपंच तात्यासाहेब औताडे, उपसरपंच सुहास चव्हाण, निवृत्त पोलिस उप अधीक्षक संभाजी सावंत, निवृत्त सातारा सैनिक स्कूल अधीक्षक तानाजी पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी बाबर, कृषी अधिकारी टी. एस बाबर , सामाजिक कार्यकर्ते डॉ. सागर सावंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना साहित्यिक लक्ष्मण हेंबाडे म्हणाले की साहित्यिकांची परंपरा असलेल्या व देशाला शिक्षणाचे धडे देणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या पावन भूमीतील सत्कार नव ऊर्जा देणारा असून मृद संधारण , जलसंधारण , वृक्ष संवर्धन व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये काम करत असताना ग्रामीण जीवन अगदी जवळून पाहता आले. प्रसंगी खेडोपाड्यातील व्यथा आणि दैनंदिन जगणं व ग्रामीण भाषा ही अधिक जवळची, जिव्हाळ्याची आणि भाव – भावना व्यक्त करण्याचे अत्यंत प्रभावी साधन बनले. आणि यातूनच हजारो साहित्यिक, कवी घडले. यात सर्वात मोठा वाटा हा ग्रामीण खेडोपाड्यांचा आहे . माणसाला दिलेली विशिष्ट जीवनदृष्टी, जीवनमूल्ये व जीवन पद्धती आणि समता, एकात्मतेची भावना याचे निखळ ज्ञान प्रभावीपणे सर्व सामान्यांच्यापर्यंत पोचविण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. म्हणून विश्वशांती आणि प्रेम, सद् भावना आणि सद् विचार यांच्या मिलनाने चिंब झालेली शब्द रचना साहित्यातून अखंडपणाने सामाजिक विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचे कार्य करते. देवापूर करानीएका साहित्यिकांचा केलेला सत्कार हा साहित्याला बळ देणारा आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पवार यांनी केले तर आभार डॉ सागर सावंत यांनी मानले.














