Home महाराष्ट्र रास्तभाव दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध, अर्ज करण्याचे आवाहन

रास्तभाव दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध, अर्ज करण्याचे आवाहन

336

 

 

यवतमाळ, दि.2 (जिमाका) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या गावांच्या ठिकाणी रास्तभाव दुकानांचे प्राधिकारपत्र मंजूर करण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणांसाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रास्तभाव दुकान परवानासाठी विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल कार्यालय येथे प्राप्त होऊन स्विकृत केले जातील. दुकानाचे अर्ज १०० रुपये चलानाद्वारे लेखाशीर्ष ४४०८ द्वारे भरणा करून संबंधित तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून घेता येईल. अर्ज विक्री व स्वीकृत करण्याची अंतीम मुदत दि.३१ जुलै पर्यंत आहे.

महागांव तालुक्यात कलगाव, बोढारा, पुसद तालुक्यात पाळोदी, पोखरी, लोभिवंतनगर, मारवाडी खु, चोंढी, पारवा खु, येहळा, गहुली, अमृतनगर, जामनाईक-२, शिवाजीनगर, ब्राम्हणगाव, मरसूळ, रंभा, पिंपळगाव पा, कवडीपूर, देवगव्हान, धुंदी, असरपेंढ, हुडी, हर्षी, हनुमाननगर, नानंद इजारा, लोहारा खु, अनसिंग, गौळमांजरी, शेंबाळ पिंपरी, शेंबाळ पिंपरी, बाळवाडी, पिंपरवाडी, धनकेश्वर येथे रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजूर करावयाचे आहे.

वणी तालुक्यात रांगणा, झोला, बोर्डा, कोलेरा, वडजापूर, महाकालपूर, येनक, साखरा को, वणी-४, कायर, बाबापूर, पठारपूर, झरपट, वागदरा, गोवारी नि, नायगाव खु, धोपटाळा, जुनाडा, बोरगाव जु, लाठी, निवली, शेलू बु, कुंड्रा, हिवरधरा, चिंचोली, शेवाळा, विठ्ठलनगर, मारेगाव को, कोरंबी, कुंभारखणी, गोडगाव, मेंढोली, नवरगाव, पिल्कीवाढोणा, केशव नगर, माथोली, जुगात, चनाखा, पाथरी, धुनकी, मूर्ती, देऊरवाडा, आमलोन, गाडेघाट, सैदाबाद, शीरगिरी, वणी-२६, दहेगाव डो, डोंगरगाव, आबई, वडगाव टीप, कुरई, विरकुंड, मजरा, पुरड (पु) येथे रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजूर करावयाचे आहे.

घाटंजी तालुक्यात कोंडजई, कोपरा वन, सायफळ, मांडावा, राजेगाव, चिंचोली, लिंगी, चांदापूर, टिपेश्वर, अंजी नृ, मोवाडा लहान, हेटीतांडा, मारेगाव, रहाटी, वाघार टाकळी, लिंगापुर, राजापेठ, सगदा. केळापुर तालुक्यात मिरा, वाढोणा बु, शामपूर, मोरवा, अंधारवाडी, सुन्ना, बल्लारपूर, हिवरी, पिंपळशेंडा, पिटापोंगरी, चोपन, निलजई, लिंगटी (भा), बेलोरी, गणेशपूर सिंचन, तातापूर, वेडद, सुसरी, पेंढरी, वडवाट, कारेगाव (बं), पांढरकवडा, झुंझापूर, नागेझरी, महाडोळी, खैरी, साखरा (बु), केगाव, बग्गी, पिंपळखुटी. झरी जामणी तालुक्यात येडसी, चिखलडोह, बाळापुर, बोपापूर, येवती, हिवरा, रामपूर, पालगाव, अम्बेझरी, बोटोनी येथे दूकान मंजूर करावयाचे आहे.

बाभुळगांव तालुक्यात उमर्डा, उमरी, डेहणी, पालोती, मांगुल, प्रतापपूर, बारड, विरखेड, लोणी, इंदिरानगर, कोपरा-१, वैजापूर, पहूर-१६, भटमार्ग, चीमणापूर, पानस, आलेगाव, राऊत सावंगी, कोतंबा, कृष्णापूर, चेंडकापूर, उमरखेड तालुक्यात कुपटी, दहागाव, एकंबा, परजना, उंचवडद, दराटी, थेरडी, उमरखेड, टेंभूरदरा, खरूस खु, घडोली, टाकळी बं. येथे दुकान मंजूर करावयाचे आहे.

दारव्हा तालुक्यात वघळ, तरनोळी, लाडखेड, सावळा. राळेगांव तालुक्यात चोंदी, एकलारा, रामतीर्थ, दापोरी कासार, वरध-२, वालधुर, तेजनी, सावरखेडा, रिधोरा, वाटखेड, करंजी सोनाबाई, गोपालनगर, श्रीरामपूर, सावनेर, धूमकचाचोरा, एकुर्ली, उमरेड, चिंचोली, चिखली वि, दापोरी कलाल, इंझापूर, वाहा, कोपरी, उमरविहीर, रानवड, सावित्री (पोंपरी), कारेगाव (नंदुरकर), चिखली (व), झोटिंगधरा, शेळी, इचोरा, आष्टा, बोरी, संगम, कळमनेर, बरडगाव, मांडवा, रोहिणी, एकबुजी, नगाई, बोराटी, खेमकुंड, पार्डी, लाडकी येथे रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजुर करावयाचे आहे.

यवतमाळ तालुक्यात पिंप्री पांढुर्णा, पिंप्री इजारा, वाटखेड, येवती, यवतमाळ, वाकी, यवतमाळ सिंघानिया नगर, धरमगाव, जांभूळणी, टाकळी, मूरझडी, दुधाना, सुकळी, वरुड, यवतमाळ, एकांक संख्येनुसार अतिरिक्त दुकान वाघापूर, जुना वडगाव, पिंपळगाव, माळीपुरा लोखंडी पूल. कळंब तालुक्यात बेलोना, म्हसोला, पिंपळखुटी, सावंगी डाफ, गंगादेवी, आलोडा, खुदावंतपूर, नीलज, खुटाळा, सोनखास, आमला, आनबोरी, खैरी, गांढा, निमगव्हाण, खडकी, कुसळ, बहऱ्हाणपूर, दत्तापूर, गलमगाव, गंगापूर, पिंपळगाव होरे, पाथ्रड, पिढा, कळसपुर येथे दुकान मंजूर करावयाचे आहे.

आर्णी तालुक्यात चातरी, चांदणी, जलान्द्री, कोपरा, माळेगाव, दोनवाडा, आमणी, जांब, परसोडा. दिग्रस तालुक्यात पेळू, मरसूळ, दिग्रस, शिवणी, वरंदळी, चिंचोली क्र १. मारेगांव तालुक्यात पांडविहीर, बोटोणी-१, कान्हाळगाव, वसंतनगर, सावंगी, चिंचमंडळ, मुकटा, बोदाड, हिवरा मजरा, डोंगरगाव, पिसगाव, पाथरी, महागाव, साखरा, टाकळी, कुंभा-२, शिवनाळा, खेकडवाई, खैरगाव बुट्टी, जळका, मेंढनी, आपटी, लाखापूर, वरुड येथे दुकान मंजूर करावयाचे आहे.

नेर तालुक्यात मारवाडी, पेंढारा, टाकळी खु, रामगाव, ब्राम्हणवाडा पश्चिम, रेणुकापूर, परजना, नेर येथे रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजूर करावयाचे आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here