Home पुणे व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत शिक्षिका सौ.शैलजा मोटे यांचे यश

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत शिक्षिका सौ.शैलजा मोटे यांचे यश

276

 

पुणे – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा दौंड तालुकास्तरीय बक्षीस वितरण समारंभ नुकताच मनोरमा मेमोरियल गर्ल्स हायस्कूल केडगाव या ठिकाणी पार पडला. या स्पर्धेत जि. प. प्राथ.शाळा बेटवाडी , ता. दौंड च्या शिक्षिका सौ. शैलजा शरद मोटे यांनी तालुकास्तरावर तीन वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक व एका गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना या कार्यक्रमात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे च्या अधिव्याख्याता तोरणे मॅडम, दौंड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी महाजन साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी मनोरमा मेमोरियल गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, केंद्रप्रमुख, पंचायत समिती दौंड चे सर्व विषयतज्ञ व शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here