Home महाराष्ट्र धरणगावात भव्य खुल्या कुस्तींचा मुकाबला. सुवर्णपदक विजेते, भारत केसरी, महाराष्ट्र आणि...

धरणगावात भव्य खुल्या कुस्तींचा मुकाबला. सुवर्णपदक विजेते, भारत केसरी, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश केसरीचा सहभाग.

255

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव: येथील चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळ तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्त 18 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात खुल्या कुस्ती मुकाबलाचे आयोजन करण्यात आले आहे.
आखाडा पूजन व कुस्ती जोड पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील व पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या हस्ते होईल. धरणगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व न्युज चॅनल प्रतिनिधी तसेच गुलाबरावजी वाघ, डी. जी. पाटील, भगवान महाजन, संजय महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कैलास माळी सर, सी.के.पाटील सर, आर. डी.महाजन सर, निलेश चौधरी, विलास महाजन, पप्पू भावे, विजय महाजन, जितेश महाजन, वाल्मीक पाटील यांच्या हस्ते होईल.
या स्पर्धेत परप्रांतीय मल्लांचा शानदार मुकाबला पाहायला मिळेल. कुस्त्यांच्या खुल्या सामन्यात महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील, भारत केसरी शमशाद शेख, उत्तर प्रदेश चॅम्पियन वसीम खान, महाराष्ट्र चॅम्पियन विजय सुराळे, हरियाणा केसरी राहील शेख, महाराष्ट्र चॅम्पियन महेश फुलमाळी, हरियाणा केसरी मोहित यादव, नाशिक चॅम्पियन सैफअली पंजाबी, मध्यप्रदेश केसरी समरोज लाला, जिल्हा चॅम्पियन अजिंक्य माळी, जिल्हा चॅम्पियन दामू वाकोडे, बुरानपुर चॅम्पियन समीर शेख, धरणगाव निलेश महाजन, चाळीसगाव संदीप पाटील असे नामवंत पहेलवान हजेरी लावणार आहेत. धरणगाव तालुक्यासह परिसरातील कुस्ती रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित द्यावी, असे आवाहन चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्षांसह पदाधिकांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here