


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : तथागत गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या बिहार येथील बोधगया या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी महाविहाराची निर्मिती केली .हे ठिकाण जगातील बौद्ध अनुयायांच्या श्रद्धेचे व प्रेरणेचे ठिकाण असून शतकानुशतके यावर मनुवादी ब्राह्मण मंडळी कब्जा करून बसलेली आहे हे ठिकाण मनुवाद्यांच्या तावडीतून मुक्त करावे यासाठी आंदोलन सुरू आहे .जगभरातील बौद्ध अनुयायी व बौद्ध भिक्कु या आंदोलनात सहभागी झालेले आहेत तरीसुद्धा शासन ठोस पावले उचलत नाही.सरकारच्या या भूमिकेचा निषेधार्थ व महाबोधी विहार मुक्त करावे व ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी शुक्रवार दि 7 मार्च 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुका व वंचित बहुजन आघाडी माण च्या वतीने उपविभागीय अधिकारी माण, खटाव,तहसीलदार माण व सहायक पोलिस निरीक्षक दहिवडी यांना निवेदन देणेत आले.
बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता
भारतीय बौद्ध म हासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीसह विविध सामाजीक, वंचित, आरपीआय आदी राजकीय विविध संघटना अर्थात, आंबेडकरवादीयांकडून तहसीलदार कार्यालयामोर हजारोंच्या संख्येने भव्य दिव्य घोषणाबाजीने धरणे आंदोलन संपन्न झाले. भारत देशातील बिहार राज्यातील बुद्धगया या ठिकाणी महाबोधी महाबुद्धविहार हे बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात नसून ते तेथील हिंदूंच्या ताब्यात असल्याने ते महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे. याकरीता अनेक दशके प्रयत्न चालू आहेत. आता सदर आंदोलनास देशव्यापी स्वरूप निर्माण झाल्याने तो लढा हा तमाम बौद्धांच्या अस्मित्तेचा लढा निर्माण झाल्याने सदर आंदोलनास वेळ काढून सर्व आंबेडकरवादी यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आपल्या अस्मि त्तेसाठी व अस्तित्वासाठी प्रचंड संख्येने कार्यकर्ते जिल्ह्यांतून आले होते. समता सैनिक, उपासक व उपासिका उपस्थीत मोठ्या संख्येनी होत्या. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात संपूर्ण परिसरात गर्दी होती.
निवेदनावर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अरविंद बनसोडे,वंचित चे तालुकाध्यक्ष युवराज भोसले,माजी सभापती बाळासाहेब रणपिसे,बौद्धाचार्य कुमार सरतापे,बौद्धाचार्य आबासाहेब बनसोडे,नागसेन कांबळे,संजय खरात,सरपंच जीवन कांबळे,संतोष कांबळे स्वप्नील कांबळे,मनोज मिसळे,सोमनाथ वाघमारे,महेंद्र भोसले,
वसंत बनसोडे, संदीप वाघमारे कार्यकर्ते उपस्थित होते.














