Home महाराष्ट्र क्रांतीसूर्य म.जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बुद्धरत्न भालेराव, तर सचिवपदी उमाकांत...

क्रांतीसूर्य म.जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बुद्धरत्न भालेराव, तर सचिवपदी उमाकांत सोनटक्के!

232

✒️बाळासाहेब ढोले(पुसद तालुका प्रतिनिधी)

पुसद(दि.5मार्च):-दिनांक ४ मार्च २०२५ रोजी संत सावता माळी ना.सह. पतसंस्था,पुसद चे संस्थापक,अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संत सावता माळी सभागृहात सभा पार पडली.

या सभेमध्ये सर्वानुमते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्सव समिती २०२५ ही गठित करण्यात आली.या समितीचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

तसेच सर्व समाजातील प्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पुसद शहरात व तालुक्यात पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार असून या समिती अध्यक्षपदी बुद्धरत्न भालेराव यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व समाजातील स्तरातून अभिनंदन होत आहे.

पुसदच्या इतिहासात पहिल्यांदाच बौद्ध समाजाच्या व्यक्तीला महात्मा फुले जयंती चे अध्यक्ष पद दिल्याने सामाजिक परिवर्तनाची नांदी लागली आहे आणि महापुरुषांच्या विचाराने चालणारा प्रगल्भ समाज निर्माण होणार आहे याचेच उदाहरण म्हणजे आंबेडकरी चळवळीचे युवा कार्यकर्ता तथा वंचित बहुजन आघाडीला पुसद तालुक्यात भक्कमपणे उभे करणारे बुद्धरत्न भालेराव यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने फुले शाहू आंबेडकर चळवळ गतिमान होण्यास वेळ लागणार नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू मानले होते. फुले अनुयायी यांनी समाजरुपी पावती दिल्याने या निवडीच्या कृतीतून ऐतिहासिक प्रतिबिंब दिसून येत आहे हेही मात्र तितकेच खरे!*

 

आजच्या सभेत

” क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती 2025 ”

अध्यक्षपदी बुद्धरत्न भालेराव,कार्याध्यक्ष नारायण ठोके,सचिव उमाकांत सोनटक्के,उपाध्यक्ष मुरलीधरराव जाधव व लक्ष्मणराव आगासे, सहसचिव ॲड. चंद्रकांत शामसुंदर,कोषाध्यक्ष आत्माराम जाधव, संघटक संजय भोने,प्रसिद्धी प्रमुख राजेश ढोले,सदस्य दिनेश वेळूकर, शाकीब शहा,संदीप आढाव, ओमकार सोनटक्के, शिवाजी सारंगे,जयकुमार भालेकर,सुनील पां.गवळी इत्यादींची उत्सव समितीच्या विविध पदावर निवड करण्यात आल्याने क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समारंभ कार्यास सुरुवात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here