Home धार्मिक  महाशिवरात्रीच्या निमित्ताने अखिल नागभीड तालुका शिक्षक संघाच्या वतीने पानपोई व फळवाटप कार्यक्रम

महाशिवरात्रीच्या निमित्ताने अखिल नागभीड तालुका शिक्षक संघाच्या वतीने पानपोई व फळवाटप कार्यक्रम

210

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.28फेब्रुवारी):- ग्राम नागभीड येथे वर्षानुवर्षापासून सुरू असलेली परंपरा शिवटेकडी येथे महाशिवरात्री यात्रा मोठ्या उल्हासात भरत असते. पंचक्रोशीतील शिवभक्त महादेवाच्या दर्शनाला पहाटेपासून मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. उन्हाची तीव्रता लक्षात घेता भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता प्रशासनाने उत्तम व्यवस्था केलेली असते. यामध्ये विविध राजकीय संघटना यांचेकडून नाश्ता व विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

त्यामध्ये अखिल शिक्षक संघाने सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत सकाळपासून भक्तांना थंड पाणी व फळांचे वाटप करून आपली बांधिलकी सिद्ध केली. सर्व भक्तांसाठी सकाळपासून पाणपोई व नाश्ता मध्ये फळ वाटप करून सहकार्य केले. या स्तुत्य उपक्रमाची दखल सर्व राजकीय संगठना, प्रशासनाने घेऊन त्यांचे कौतुक केले.

शिक्षक संघाच्या स्टॉल ला विविध मान्यवरांनि भेटी दिल्यात त्यात चिमूर विधानसभा आमदार बंटी भांगडीया, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे,ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, माजी उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर,देशोन्नती पत्रकार अरुण गायकवाड,व्यापारी संगठना अध्यक्ष हनिफ जादा यांनी शिक्षक बांधवांचे अभिनंदन केले. या उपक्रमाच्या यशस्वी तेसाठी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप चंदनबावणे , सचिव- राहुल कळंबे ,अखिल संघाचे सल्लागार राजकुमार एकवनकर ,गजेंद्र जवंजाळ ,प्रभाकर करंबे ,कृष्णा बहेकार, गजानन रत्नपारखी,अरुण दोईतरे, लुमदेव मोरांडे, विनोद सातव ,टेमदेव नवघडे,गिरीश नगरे, नितीन अनरसकर ,नानाजी सहारे,शेषराव लोणारे, विजय भेंडारकर, होमदेव नान्हे,मदन मरसकोल्हे ,राजू निमजे , मंगेश कोरे ,होमराज सलामे,मंगेश नौकरकर, ,संदीप कुमरे सतीश गायधने प्रशांत कोरे,महिपाल मांढरे, नंदा दुरबुडे माया सहारे ,संध्या बहेकार ,नीता निनावे,रेखा आकरे, योगिता कोरे,भारती पिसे,तसेच जेष्ठ नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला विशेष सहकार्य प्राथमिक शिक्षक सोसायटी सिंदेवाही व नागभीड यांचे लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here