


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.20फेब्रुवारी):-गंगाखेड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचेअनावारण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. हा शोहाळा पाहण्यासाठी गंगाखेड तालुक्यातील शिवप्रेमी चा जनसागर उसळला होता. दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार रोजी रात्री 8 वाजन्याच्या सुमारास नियोजित पुतळ्याच्या परिसरात लेझर शोच्या झगमगात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या वेळी फुलांच्या हराची सजावट करून, विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच विविध रंगाची अतिशबाजी करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी लहानमोठया पासून महिलांची लक्षनीय उपस्तिथी दिसून आली.
हा अनावरण सोहळा सर्वच उपस्थित असलेले मान्यवरांच्या हस्ते पार पडला, या सोहळ्यास परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, गंगाखेड विधान सभा चे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, माझी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, माझी नगर अध्येक्ष विजय कुमार तापडिया, माझी नगर अध्येक्ष रामप्रभू मुंडे, भाजपा ग्रामीणजिल्हा अध्येक्ष संतोष मुरकुटे, शिवसेना नेते विशाल कदम (एकनाथ शिंदे गट )उपविभागीय पोलिस अधिकारी गंगाखेड ऋषिकेश शिंदे, आदिसह मन्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.














