Home Breaking News पोलिस, न्यायाधीश आरोपींना माननिय म्हणत नाहीत…!

पोलिस, न्यायाधीश आरोपींना माननिय म्हणत नाहीत…!

512

पोलिस आणि न्यायाधीश कडे काही कार्यक्रम असले तर ते तेथे पाहुण्यांच्या, मित्रांच्या नावापुढे श्री, माननिय, सन्मानिय, आदरणीय असे आदर युक्त संबोधन करतात. पण तेच पोलिस आणि न्यायाधीश आरोपीला कधीच माननिय, सन्मानिय, आदरणीय असे संबोधन करून बोलत नाहीत किंवा लिहीत नाहीत. जरी आरोपी त्यांचा नातेवाईक किंवा गुरूजी असला तरीही. तर मग आपण चोरांना का माननिय, सन्मानिय, आदरणीय असे म्हणतो? आपण चुकतो. मला वाटते ज्या ज्या नोकरांनी,अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, आमदार, खासदारांनी, मंत्री ने चोरी केली असेल, भ्रष्टाचार केला असेल, अत्याचार केला असेल अशी आपली माहिती असेल किंवा खात्री असेल तर त्याला बोलतांना, त्याचे नांव लिहीतांना माननीय, सन्मानिय, आदरणीय असे संबोधन करू नये. जर पोलिस आणि न्यायाधीश आरोपीचा आदर करीत नाहीत तर आपण का करावा? कारण कायदे तर ते जास्त जाणतात. तर मग त्यांचे अनुकरण केले पाहिजे.

   काही रबरी, प्लॅस्टिक लोक आक्षेप घेतात कि, सन्मान देणे आपली संस्कृती आहे. तर मी म्हणतो तो त्यांचा गैरसमज आहे. सन्मान फक्त सज्जनांचा, गुरूजनांचा केला पाहिजे. उठ सूठ कोणत्याही चोराला तर लबाड, बदमाष, हरामखोर, भ्रष्टाचारी असे निरादर युक्त संबोधन केले पाहिजे. अपमानित केले पाहिजे. विनाकारण सन्मान देऊ नये.

      मी आधीच उघडपणे लिहीले, बोललो कि आमदार आणि मतदार यांची लेव्हल एकच. हो! त्याला आपल्याच लेव्हलला ठेवले पाहिजे. जास्त उंचीवर जात असेल तर त्याचे पाय आखूड केले पाहिजे. डोक्यावर घेतले तर तो माजावर येतो. डोक्यावर पाय ठेवतो. मग, तुम्ही चेंगरले गेले कि म्हणतात, मला न्याय पाहिजे. जर स्वतः स्वतः वर अन्याय करून घेत असेल तर न्याय कोण देणार?

        एका कार्यक्रमात तुम्ही आमदार बोलवला. तो अध्यात मध्यात आला. तर त्याला त्याच्या स्टाईलने बसू द्यावे. त्याच्यासाठी कोणाचेही भाषण, बोलणे वगैरे अडवू नये. लग्नात आला तरीही एक आमंत्रित, निमंत्रित म्हणून पहावे. उगीच भटजींना सांगून मंत्रोच्चार बंद करू नयेत. त्याला जाणिव होते कि, हे लोक जास्त मुर्ख नाहीत. येथे यांना नौटंकी आवडणार नाही. तो स्वताला चाचपून असतो.

    मी कोणत्याही कार्यालयात गेलो आणि पाहिले कि लोक विनाकारण काटकोनात वाकतात. काहीतर लघुकोनात वागतात. जरी तो अधिकारी याला कुचमाल समजून काम करीत नसला तरीही! यामुळे त्यांचे फावते. तो चोरी करायची हिंमत करतो. हे चुकीचे आहे. याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

     असाच प्रकार आमदार खासदार मंत्री समोर करतात.

     सज्जनाचा, गुरूजनांचा आदर करणे संस्कृती आहेच. आपण रामाला श्रीराम म्हणतो. रावणाला श्रीरावण म्हणत नाहीत. कृष्णाला श्रीकृष्ण म्हणतो. कंसाला श्रीकंस म्हणत नाहीत. हिच तर संस्कृती आहे. या संस्कृती चे आपण पाईक आहोत तर पालन केले पाहिजे.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here