Home महाराष्ट्र सेंद्रिय शेती  काळाची गरज – श्री चंद्रकांत कोळी 

सेंद्रिय शेती  काळाची गरज – श्री चंद्रकांत कोळी 

230

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.4फेब्रुवारी):-“सेंद्रिय शेती ही आता काळाची गरज झाली असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर समाजजीवनाचे स्वास्थ निरोगी राहील. शेतीचा पोत सुधारला पाहिजे. आपण घेत असलेल्या पिकांचे एकात्मिक किड व्यवस्थापन करायला हवे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकात एकरी दोन प्रकाश साफळे बसवावेत. प्रत्येक अमावास्याच्या दरम्यान चार दिवस सायंकाळी 6 ते  9 यावेळेत हे प्रकाश साफळे बसवावेत म्हणजे किडींचे व्यवस्थापन होईल. व उत्पन्नात भरघोस वाढ होईल.” असे प्रतिपादन मा. श्री. चंद्रकांत कोळी(मंडल कृषी अधिकारी, मल्हारपेठ) यांनी केले. ते मौजे किवळ येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिरात सेंद्रिय शेती व एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते तसेच त्यांनी स्वतः तयार केलेला प्रकाश साफळा याच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविले.   

          सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शशिकांत भीमराव साळुंके म्हणाले की, “भविष्यात आपणाला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय राहणार नाही. रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून लोकांचे आयुर्मान घटले आहे. तेव्हा नैसर्गिक शेती करून आपण निरोगी पिकांचे उत्पादन घ्यायला हवे.”

       सदर कार्यक्रमास मा. सौ. संगिता साळुंखे (माई), (सदस्य, केंद्रीय दिशा समिती), कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे, प्रा. डॉ. एन. ए. पाटील, श्री प्रदीप काशीद (सरपंच), मा. श्री. कैलास साळुंखे (उपसरपंच), मा. श्री. पांडुरंग साळुंखे, श्री. अमोल मुळीक, श्री. मोहन साळुंखे, श्री. संतोष साळुंखे, श्री संभाजी साळुंखे, श्री उदय साळुंखे, संजय कुलकर्णी, श्री रामचंद्र धरणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या सुरवातीला शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एन.एस.एस. गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीमती एस. एम. चव्हाण यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रांजळ कांबळे याने करून दिला. तर आभार साहिल पाटील याने मानले. सूत्रसंचालन कुशान भोसले याने केले. या समारंभास मौजे किवळ येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, तसेच वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्रा. श्रीमती पी. आर. कदम, प्रा. व्ही. के. थोरात, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here