


महाराष्ट्रात पालकमंत्री बनण्यासाठी मंत्री चंबळचे डाकूसारखे भांडत आहेत. खरोखरोच यांना पालक बनून सेवा करायची आहे का? यांना जिल्हाचा विकास करायचा आहे का?
“सारा हिंदुस्थान जानता है, पालकमंत्री चोरी करनेवाला है!”
मंत्री म्हणजे चोर. आणि पालकमंत्री म्हणजे महाचोर!आता हे लपून राहिलेले नाही. असा एकही मतदार नाही कि ज्यांना पालकमंत्री प्रामाणिक वाटतो. शाळेतील पोरं सुद्धा जाणतात कि मंत्री चोरी करतात.जर १००टक्के मतदारांना मंत्री चोर असल्याची आणि पालकमंत्री महाचोर असल्याची खात्री असेल तर उघड उघड एकसुरात बोलले पाहिजे. आमचा मंत्री चोर आहे. आमचा पालकमंत्री महाचोर आहे. हाच एक इलाज उरला आहे.जर कोणी पोलिस किंवा अधिकारी किंवा न्यायाधीशाला हे कळत नसेल किंवा कळत असूनही मान्य होत नसेल तर ते देशाची सेवा करीत नसून चोरांचे समर्थन, बचाव करीत आहेत. भारतातील सर्वच नोकरांनी नोकरीत लागतांना प्रामाणिकपणे देशसेवा करण्याची शपथ घेतलेली आहे. ती आठवण करून देत आहे.
सैतानाला सर्वांनी खडा मारण्याची परंपरा मुसलमान धर्मात आहे.एका ठिकाणी तर चप्पल ची मजार आहे.कोणीही यावे आणि चप्पल मारून जावे. आता तो मान सन्मान मंत्री आणि पालकमंत्री यांना दिला पाहिजे.
मी स्वतः अनेक माजी मंत्री आणि पालकमंत्र्यांना विनंती केली कि, तुम्ही एकदा तरी प्रामाणिकपणे सांगा. फुलन देवी ने सुद्धा खरे खरे सांगितले होते कि, किती खून केले आणि का केले?तर तुम्ही सुद्धा मरता मरता सांगून टाका. कि मंत्री अशी चोरी करतो. पालकमंत्री असे चोरी करतो, असे हप्ते घेतो.तुम्ही नाही घेतले असे म्हणा,वाटल्यास.जरी तुम्ही चोरी केली असेल, हप्ते घेतले असतील तर तुम्हाला माफीचा साक्षीदार समजून माफ करू.
असा कोणी मंत्री जर माफीचा साक्षीदार बनत असेल, सर्व चोरी, हप्ते बाबत उघड उघड सांगत असेल तर तो आज देशाचा आयडॉल मानला जाईल.
सजन रे झुठ मत बोलो,
खुदाके पास जाना है.
वहां गाडी है ना घोडा है,
सबको ,पैदल जाना है!
शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव मो.९२७०९६३१२२














