Home महाराष्ट्र अखेर नेरी ग्रामपंचायतने चोख पोलीस बंदोबस्तात पिएचसी चौकातील अतिक्रमण हटविले

अखेर नेरी ग्रामपंचायतने चोख पोलीस बंदोबस्तात पिएचसी चौकातील अतिक्रमण हटविले

631

▪️१२ पोलिस अधिकारी, ५५ पोलिस कर्मचारी, दंगा नियंत्रक पथक होते तैनात

✒️संजय नागदेवते(विशेष प्रतिनिधी)मो:-9423415604

  नेरी(दि.27जानेवारी):-चिमुर तालुक्यातील महत्वाचे शहर असलेल्या नेरी येथील पिएचसी चौकातील रेंगाळलेले अतिक्रमण बुलडोझर चालवुन अतिक्रमणाचा पुर्ण सफाया केला.

   आठ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतने हाती घेतलेले अर्धवट राहिलेले अतिक्रमण काही कुटुंबानी आडकाठी टाकुन न हटविण्याचा पवित्रा घेतला होता, त्यामुळे ग्रामपंचायत ची अतिक्रमण हटाव मोहिम रेंगाळली होती.

त्यानंतर तिन दिवसाच्या फरकाने ग्रामपंचायतने अतिक्रमण धारकांना नोटीस देवुनही अतिक्रमण हटविले नाही. तेव्हा काही सुरक्षेच्या कारणास्तव व अतिक्रमीत कुटुंब धारकांचा विचार करता मोहिम थांबविण्यात आली. 

नेरी ग्रामपंचायतने कायद्याची सुरक्षेची धंदेवाईक यांचा व कुटुंबाची 

सर्वपरी विचार करून पुर्ण यांची पुर्तता करुन दिनांक २७ जानेवारीला सकाळी ९ वाजता नेरी ग्रामपंचायतने अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ केला.

                                              यामध्ये संपूर्ण कर्मचारी टिम ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्राम अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य 

व चिमुरचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली १२ पिसआय अधिकारी मध्ये एपिआय तायकुडे, जाधव पो. उप निरीक्षक, पाटील मॅडम पिसआय, गोदीगलवार, आणि ५५ पोलिस कर्मचारी व दंगा नियंत्रण पथक यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्तासहीत पिएचसी चौकातील पुर्ण अतिक्रमण धारकांना हटविण्याचे सुचना देवुन दोन बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याचे मोहीमेला यश मिळाले. 

   काहीं व्यवसायिकांनी स्वतःच अतिक्रमण काढण्यास धन्यता मानली तर काही दुकानदारांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची पोलिस विभागाच्या सहाय्याने समजूत काढून पुर्ण अतिक्रमण या परिसरातील काढण्यात आले.

                                        अतिक्रमण हटाव मोहिमेत शासकीय कामात ज्यांनी अडथळे निर्माण केले त्यांना पोलीसांनी डिटेन केले व त्यांचे दुकानातील साहीत्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. 

   पीएचसी चौकातील नेरी-नवरगाव मार्गाच्या लगत असलेल्या आबादी जागेवर संवीधान सभागृहाच्या निर्धारित केलेल्या जागेवर काहींनी पक्के घर तर काहींनी कच्चे बांधकाम करुन दुकान थाटले होते व अन्य दुकानदारांनी या चौकाला अतिक्रमणाच्या विळख्यात गोवले होते, दरम्यान ग्रामपंचायतने नोटीस बजावुन सुद्धा अतिक्रमण काढीत नव्हते त्यामुळे नाईलाजास्तव सदर च्या अतिक्रमण धारकांना नेरी ग्रामपंचायतने बुलडोझर चालवण्याचा मोठा निर्णय घेत अखेर पिएचसी चौकातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचा पुर्ण सफाया केला.

यामुळे ईथे ग्रामपंचायतचे निर्धारित जागेवर संविधान सभागृह उभे होईल व या चौकाचे सौदर्यिकरणाच्या कामाला गती मिळुन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here