Home महाराष्ट्र जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक...

जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक रमेश महाजन याचा सन २०२४-२५ चा जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

191

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगांव(दि.27जानेवारी):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना *”गुणवंत खेळाडू”* पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०२४-२५ चा “गुणवंत खेळाडू पुरस्काराने आज जिल्हयाचे पालकमंत्री नामदार श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले, यावेळी माननिय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक सर उपस्थित होते.

पुष्पक ला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष श्री ललीत पाटील, महासचिव श्री अजित घारगे, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री सौरभ चौबे, श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, जयेश बाविस्कर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here