Home महाराष्ट्र भूपाल शेटे, सुहास कारेकर, आदित्य म्हमाने यांचा जाहीर नागरी सत्कार मृत्यूला...

भूपाल शेटे, सुहास कारेकर, आदित्य म्हमाने यांचा जाहीर नागरी सत्कार मृत्यूला भिडणारी गोष्ट या लघुपटाचा प्रिमीअर शो संपन्न

114

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्केटिंग हा भारतीय खेळामधील एक महत्त्वाचा खेळ असून एस. के. रोलिंग अकॅडमीच्यावतीने या खेळामध्ये अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल या अकॅडमीचे अध्यक्ष भूपाल शेटे व सचिव सुहास कारेकर यांचा त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रामध्ये लहानपणापासूनच भरीव योगदान देणाऱ्या व दहाहून अधिक लघुपटात मुख्य भूमिका साकारून कलेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला कोल्हापूरचा बाल कलाकार आदित्य म्हमाने यांचा यावेळी कला शिक्षिक सागर बागडे, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी निर्मिती फिल्म क्लब निर्मित स्केटिंग : मृत्यूला भिडणारी गोष्ट या संवेदनशील लघुपटाचा प्रिमीअर शो संपन्न झाला. सिने अभिनेते संजय मोहिते, सामाजिक कार्यकर्ते अब्राहमबापू आवळे यांच्या हस्ते क्लॅप मारुन लघुपटाचे उद्घाटन करण्यात आले.
स्केटिंग : मृत्यूला भिडणाऱ्या संवेदनशील मुलाची गोष्ट असून या लघुपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक अनिल म्हमाने, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, सहनिर्माता विश्वासराव तरटे, सिकंदर तामगावे, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक अर्हंत मिणचेकर, अंतिमा कोल्हापूरकर यांचे तर डी.ओ.पी. म्हणून अमर पारखे यांनी काम पाहिले आहे.
कथा व संवाद अनिल म्हमाने यांचे असून सुहास कारेकर, भूपाल शेटे, आदित्य म्हमाने, अंतिमा कोल्हापूरकर, सतेज औंधकर, राहुल जगताप, विश्वासराव तरटे, वंदना धनवडे, मंथन जगताप, नमिता धनवडे, दिक्षा तरटे, तक्ष उराडे, भूमी पासवान, प्रज्ञा पाटोळे, कृष्णा नेताले, सार्थक गावडे, अधिराज अथने यांच्यासह पन्नासहून अधिक खेळाडूंनी यात काम केले आहे.
यावेळी संजय मोहिते, सागर बगाडे, भूपाल शेटे, अब्राहमबापू आवळे, अनिल म्हमाने, सुहास कारेकर, ॲड. करुणा विमल, नीती उराडे, अंतिमा कोल्हापूरकर यांनी मनोगते व्यक्त केली.
सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर तर आभार अर्हंत मिणचेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here