


✒️बाळासाहेब ढोले(पुसद-यवतमाळ,प्रतिनिधी)मो:-7875157855
पुसद(दि.9जानेवारी):-पत्रकार दिनानिमित्ताने पुसद येथील जमाते इस्लामी हिंद,तर्फे पुसद मधील पत्रकार बांधवांचा सत्कार सैय्यद सलमान सरांच्या राहत्या घरी अरुण ले आउट मध्ये करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अलीयार खान जनाब होते. तर मार्गदर्शक म्हणून शेख नईम सर होते. सरांनी उपस्थितीत पत्रकार बांधवांच्या कार्याचा प्रशंसा करण्यात आली .सोबतच आजच्या काळात सामाजिक सलोख्याची अवशकता आहे तसेच समाजाला आज वास्तविक मांडणाऱ्या पत्रकारांची आवश्यकता आहे हे नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमात पत्रकार बंधू बळवंत मनवर ,राजेश ढोले , समाधान केवटे,राजेश सोनुने,अरुण बरडे,विजय निखाते,रविकांत शिंगणकर, ऋषिकेश जोगदंडे, शंकर माहूरे, प्रकाश खिल्लारे,कैलास श्रावणे, ॲड प्रदिप नरवाडे , बाळासाहेब ढोले,हानिफ शेख,आदी पत्रकारांचा शाल,पुस्तक, पेन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमात प्रमुख उपस्थिती माणुसकीची भिंत या सामाजिक संघटनेची होती.आलेल्या सर्व सदस्यांचे आभार सय्यद सलमान सरांनी केले.














