


समाज एकता अभियान हे गेल्या काही वर्षापासून समाजाच्या सामाजिक व राजकीय ऐक्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच समाजातील समस्या जसे आरोग्य, शिक्षण व इतर महत्वाच्या समस्येवर सुद्धां काम करत आहे. समाजातील समस्या समुळ नष्ट एका कडून शक्य नसले तरीही एकेकाने समोर आले तर आपण बरेच मोठे कार्य करू शकतो. कोरेगांव भिमाच्या दंगलील निरापराध तरुणांच्या सुटकेपासुन तर अनेक रुग्णांना आर्थिक मदत, अनेकांना शैक्षणिक मदत करण्याचे काम समाज एकता अभियान करत आहे. रुग्णांना, विद्यार्थ्यांना किंवा समाजातील गरजु घटकांना आर्थिक मदत करणे कोणत्याही एका व्यक्तीला शक्य नाही म्हणून समाजातील दानशूर व जागृत लोकांकडून आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते. यामध्ये अनेक दानशूर व्यक्ती सढळ हाताने खुप मोठी मदत करत असतात. समाज एकता अभियान हे महाराष्ट्राभर राबण्याचे काम समाज एकता अभियान चे अध्यक्ष सतिश प्रघणे सर करत असतात तर सचिव म्हणून विनोद सदावर्ते जबाबदारी पाहतात. समाजातील अनेक लोक दान किंवा सामाजिक कार्याच्या जाहीराती, किंवा फोटो शेअर करतात.
दोन केळी, वहीपेन देऊन गरजू वर उपकार केल्यासारखे वागतात. परंतु समाज एकता अभियान कोणत्याही कार्याची जाहिरात करत नाही किंवा कोणत्याही कामाचे श्रेय स्वतः कडे घेत नाही. हार तुरे, मान सन्मान या गोष्टी मुळेंच समाजात अनेक नेते निर्माण झाले याची जाणीव ठेऊनच समाज एकता अभियानच्या कामाची रूपरेषा ठरवली जाते. समाज एकता अभियान समाजाच्या हितासाठी व समाजातील घटकांना एकत्र घेऊन काम करण्यासाठी च तयार केलेले आहे. एकेकाने केलेल्या किंवा बेकिने केलेल्या कामाला महत्त्व येत तर एकीने केलेल्या कामाची छाप पडुन प्रभाव निर्माण होतो. म्हणून समाजातील जागृत, वैचारिक, दानशूर, सुशिक्षित लोकांनी एकत्र येऊन थोडे थोडे जरी काम केले तरीही खुप मोठे काम दिसून येते. समाज एकता अभियान ला अनेक दानशूर लोक वेळोवेळी सहकार्य करतात. प्रत्येक दानशूर व जागृत आणि बाबासाहेब यांच्या विचाराशी प्रामाणिक असलेल्यांचे नाव घेणे शक्य नाही. परंतु त्यातही काही लोक असे असतात की त्यांचा उल्लेख करणे आवश्यकच असतो. तो उल्लेख जाहिरात म्हणून नाही, मोठेपणा म्हणून नाही तर त्यांच्या कामाची शैली म्हणून करणे गरजेचे आहे. त्यात पहिले नाव येते विनोद विरघट सर यांचे. विनोद विरघट सरांनी आजपर्यंत समाज एकता अभियान साठी खुप काही योगदान दिले आहे. समाज एकता अभियान साठी वेळ व पैसा देऊन अभियान वाढीसाठी पाहिजे ते सहकार्य करण्यासाठी ते सज्ज असतात.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक काम स्वतःच्या खर्चातून करूनही त्याचे श्रेय स्वतःला न देता ते समाज एकता अभियान ला देतात. खरचं असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक अनुयायी कृतीशील खुपच कमी असतात. दुसरे नाव आहे ते म्हणजे सुमेध घनबहादूर सर. स्वतः ची नोकरी, घर सांभाळून समाज एकता अभियान ला वेळ देऊन प्रत्येक नियोजन करण्याचे सर्व काम करतात. वेगवेगळ्या दानशूर लोकांकडून आर्थिक सहकार्यापासून तर सामाजिक कार्यक्रमाच्या नियोजना पर्यंत सर्व तेच बघतात. अनेक लोक आज नोकरी वर आहेत परंतु नोकरीचे कारण सांगून वेळ देण्यास टाळाटाळ करतात तर काही लोक आर्थिक, किंवा इतर कारण सांगून पाचशे हजार रुपयांचे सहकार्य ही करत नाहीत. अशी परिस्थिती असताना सुमेध घनबहादूर सर काम करण्याची फक्त संधी बघतात. अनेक नोकरदार किंवा पैशावाले लोक आर्थिक सहकार्याची अपेक्षा केली तर पळवाट शोधतात, टाळाटाळ करतात. फक्त जयभिम बोलणे आणि ज्ञानाच्या गप्पा करणे म्हणजे आंबेडकरवादी नव्हे तर बोलण्याला कृतीची जोड असणे म्हणजे आंबेडकरवादी होय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उत्पन्नातील विसावा भाग अर्थात पाच टक्के उत्पन्न हे समाजाच्या हितासाठी अर्थात शिक्षण, आरोग्य व रोजगार यावर खर्च करायला पाहिजे असे सांगितले आहे.
पण जयभिम बोलणारे आणि महिन्याला हजारो लाखों रुपये कमवणारे लोक वार्षिक उत्पन्नातील एक टक्का ही खर्च करत नसतील आणि खर्च करायचा तर पळवाटा किंवा कारणे सांगत असतील तर त्यांना आंबेडकरवादी कसे म्हणावे? बरेच लोक नाच गाण्यासाठी हजारो दोन हजार रुपये देतात आणि स्वतःला धन्य समजतात अशा लोकांची संख्या जास्त असली तरीही अजूनही विनोद विरघट सर, सुमेध घनबहादूर सरांसारखे लोक अजूनही समाजासाठी झटत आहेत. अजून एक व्यक्ती म्हणजे सतिश प्रघणे सर. समाज एकता अभियान चे अध्यक्ष असुन कोणतेही सामाजिक काम करायचे तर कधीच नकार न देणारे, कोणत्याही कामाला प्रोत्साहन देऊन स्वतः चा सहभाग कसा वाढवता येईल याचे नियोजन करून समाज एकता अभियान ला वेळोवेळी खुप मोलाचे सहकार्य करून महत्वाची धुरा सांभाळतात. आज पर्यंत समाज एकता अभियान ने अनेक सामाजिक प्रश्न निकाली काढले, अनेकांना सहकार्य करून फुल ना फुलाची पाकळी दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात यामध्ये सर्व दानशूर, वैचारिक व जागृत लोकांचे सहकार्य, योगदान मुळीच विसरून चालणार नाही. सामाजिक काम करताना चांगले, वाईट अनुभव येत असतात. परंतु समाज एकता अभियान वाईट अनुभव आले म्हणुन खचून न जाता आपण आपले चांगले काम करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतात. बऱ्याच लोकांकडून आर्थिक सहकार्याची अपेक्षा केली की लोक पळवाट काढून ते टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु हजार पाचशे रूपये जर गरजुला दिले तर आपले काही कमी होणार नाही. उलट नैतिक जबाबदारी समजून ते खर्च करणे आवश्यक आहे. टाळाटाळ करणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणून समाजात आजही सामाजिक कार्याची गरज आहे.
हजार पाचशे दहा विस लोकांनी जरी दिले तर दहा विस हजार रुपये एका वेळेस तयार होतात. पन्नास शंभर जरी दानशूर व्यक्ती ने हजार पाचशे रुपये एकत्र केले तर पन्नास हजार ते एक लाख रुपये तयार होतात. त्यामध्ये एखादे चांगले काम होऊन एखाद्या ची समस्या सूटू शकते. असो समाजिक काम करणे, हे बोलण्यात नाही तर कृतीतून पाहिजे असते. आणि विनाजाहिरात व प्रमाणिक काम समाज एकता अभियान करत आहे. म्हणून समाजातील गरजु घटक समाज एकता अभियान पर्यंत पोहचत आहेत. यातुनच कामाची पावती दिसते.
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(समाज एकता अभियान,रा. आरेगांव ता. मेहकर)मो:-९१३०९७९३००














