Home महाराष्ट्र युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशनात केले पत्रकार बांधवाना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने...

युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशनात केले पत्रकार बांधवाना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

122

✒️बाळासाहेब ढोले(पुसद-यवतमाळ,प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.7जानेवारी):-पत्रकार दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील स्व. वसंतराव नाईक सभागृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय आधिवेशन पार पडले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. गणेशजी कचकलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळेस युवा ग्रामिण पत्रकार संघटनेच्या दिनदर्शिकेचा मोठ्या थाटात लोकार्पण सोहळा पार पडला,तसेच सर्वोत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून पुसद युवा ग्रामिण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष कुलदिप सुरोशे व सचिव सुर्यकांत राठोड पुसद यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हे विशेष…!

जिल्हातील ठिक ठिकाना वरून आलेल्या सर्व तालुका अध्यक्षांना ही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या अधिवेशनात पत्रकार बांधवाच्या काही मागण्या होत्या .
ते यावेळेस कथीत केल्या की पत्रकार बांधवांना शासनातर्फे मानधन देण्यात यावे तसेच पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचारांवर शासनाने त्वरित दखल घेण्यात यावी करिता शासनाने तत्पर राहावे असे अनेक मुद्दे यावेळी करण्यात आले.

सदर राष्ट्रीय आधिवेशानात पुसद येथून युवा ग्रामिण पत्रकार संघटना शाखा पुसद येथील तालुका अध्यक्ष शकुलदिप सुरोशे सचिव सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्युज चे संपादक तालुका उपाध्यक्ष व आवाज सत्याचा न्युज चॅनलचे संपादक ज्ञानेश्वर मेटकर प्रसिद्धी प्रमुख दैनिक सुपर भारतचे सिद्धार्थ कदम संघटक अनिल पवार यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here