Home महाराष्ट्र मौजे करवडी येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराचा” समारोप संपन्न

मौजे करवडी येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराचा” समारोप संपन्न

191

✒️करवडी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

करवडी(दि.30डिसेंबर):-विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, श्रमाला व प्रतिष्ठेला न्याय मिळावा, संधी मिळावी यासाठी अशा प्रकारची शिबिरे जीवनात महत्त्वाची असतात. कारण विद्यार्थी हे आपल्या विश्वात रममान झालेले असतात. याच्या पलीकडचे जग त्यांना माहित नसते .पण अशा प्रकारच्या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना घर सोडून बाहेर जाण्याची व राहण्याची संधी मिळते. या निमित्ताने शिबिरार्थींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवणारी व्याख्याने येथे झाली. या शिबिरामध्ये दैनंदिनी प्रमाणे सर्व कार्यक्रम व उपक्रम यशस्वीपणे पार पडले .या दैनंदिनी प्रमाणेच शिबिरार्थींनी आपल्या अंगी या सवयी जोपासाव्यात. या गावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी संधी दिली व शिबिराला मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल ग्रामस्थांचे मी कौतुक करतो. असे मत वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड कनिष्ठ विभागाच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड यांनी मांडले.

याप्रसंगी करवडी गावचे युवा नेते मा. श्री संजय पिसाळ यांनी या शिबिराचे कौतुक करताना शिबिरार्थींनी या गावाची मनोभावे सेवा केली व विशेष वक्त्यांच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांचे प्रबोधन केले. सतत सात दिवस विविध उपक्रम राबवून मौलिककार्य केले. ही शिबिरे गावासाठी तसेच शिबिरार्थीसाठीसुद्धा प्रेरणादायी असतात. असे मत व्यक्त केले. या शिबिरामध्ये आलेले अनुभव कथन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी अथर्व पिसाळ व कु.पूजा पाटील यांनी अनुभव मांडले.

या समारोप समारंभाचे अध्यक्षपद मा. श्री. राहुल बाळासाहेब भोसले उपसरपंच, करवडी ग्रामपंचायत ,करवडी यांनी भूषवले. मा.श्री अरुण पांडुरंग पाटील (काका), श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड व मा. प्राचार्य डॉ. एस .बी .केंगार सेक्रेटरी, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संजय पाटील, कृष्णा चव्हाण ,शिवाजी पिसाळ ,उत्तम पिसाळ ,युवराज कुंभार, प्रताप पाटील, संपत माने ,विजया कांबळे ,मुख्याध्यापिका विजया पाटील, संजय पिसाळ, संभाजीराव पिसाळ,सोमनाथ पिसाळ ,नितीन डुबल, विक्रम पिसाळ ,उत्तम काशीद, संभाजी पिसाळ, रोहित चिंचकर ,उपप्राचार्य आर .ए. कांबळे, पर्यवेक्षिका एस .एस.मधाळे ग्रामपंचायत सदस्य ,सोसायटीचे संचालक यांची उपस्थिती होती .

या समारोप समारंभाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्या डॉ. श्रीमती एस. आर .सरोदे यांनी केले. शिबिराचे अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी श्रीमती एस पी. पवार यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.पी .एस. पाटील यांनी करून दिला. प्रा.एन .बी. पाटील यांनी आभार व्यक्त केले व श्रीमती आर. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक, ग्रामस्थ व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here