Home महाराष्ट्र सेंद्रिय शेती काळाची गरज- अभिजीत पाटील

सेंद्रिय शेती काळाची गरज- अभिजीत पाटील

260

कराड: भारत हा शेतीप्रधान देश आहे. परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते. इ.स सन 1960 च्या दशकात शेतकी संशोधन, विकास तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषी उत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार करण्यात आला. भारताच्या कृषी मंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार एम. एस. स्वामीनाथन यांना भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्रातील हरितक्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली होती. असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” तिसऱ्या दिवशी ‘सेंद्रिय शेती काळाची गरज’ या विषयावर प्रमुख पाहुणे मा. श्री अभिजीत बाळासाहेब पाटील (मंडल कृषी अधिकारी, सैदापूर) यांनी केले.
त्यांनी विविध उदाहरणाच्या सहाय्याने रासायनिक औषधे कीटकनाशके यांचा अतिवापर केल्याने आपल्या आरोग्यासाठी व शेतीसाठी तो कसा हानिकारक आहे हे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री अमोल उत्तम पिसाळ ग्रामपंचायत सदस्य, करवडी हे होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी अथर्व पिसाळ याने केले. तसेच पाहुण्यांचा परिचय अनुराधा पवार या शिबिरार्थीने केला. व आभारप्रदर्शन पूजा पाटील या शिबिरार्थीने केले. या कार्यक्रमात सर्व शिबिरार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here