Home नागपूर डॉ.अमित मुंगले “भारत उद्योगरत्न पुरस्कार २०२४” पुरस्काराने सन्मानित

डॉ.अमित मुंगले “भारत उद्योगरत्न पुरस्कार २०२४” पुरस्काराने सन्मानित

280

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.26डिसेंबर):- नुकताच “भारत उद्योगरत्न पुरस्कार २०२४” नागपूर येथील रिजेंटा सेंट्रल होटल व कन्वेंशन सेंटर येथे १६ डिसेंबर ला पार पडला. यामध्ये “ऑर्थोपेडिकमधील सर्वोत्तम आयुर्वेद चिकित्सक” या विभागतून भिसी येथील डॉ.अमित शंकरराव मुंगले यांना “भारत उद्योगरत्न पुरस्कार २०२४” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी हा पुरस्कार डॉ.अमित मुंगले यांना प्रदान केला.

डॉ.अमित मुंगले मागील ८ वर्षांपासून भिसी येथे आणि ३ वर्षांपासून उमरेड येथील जीवन विकास चौक येथे सेवा देत आहेत. यादरम्यान अनेक रुग्णांवर यशस्वी व उत्कृष्ट उपचार करून त्यांना स्वस्थ केलेलं आहे. त्यामध्ये कमरेसंबंधी व मानेसंबंधी समस्या, टाच, गुडघा, मुंग्या येणे आणि सुन्न होणे (न्यूरोपॅथी) व कटिप्रदेश इत्यादी व्याधीवर यशस्वी उपचार म्हणून “ऑर्थोपेडिकमधील सर्वोत्तम आयुर्वेद चिकित्सक” कार्यासाठी आयोजकांनी नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आलेला आहे. त्यांनी या पुरस्काराचे श्रेय आपले पालक, गुरुजन व परिवार यांना दिलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here