✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.22डिसेंबर):-शब्दगंध साहित्यिक परिषद,संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष श्री.राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.२५/१२/२०२४ रोजी स.११.०० वा कोहिनूर मंगल कार्यालय,पाईपलाईन रोड,सावेडी,अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
अशी माहिती संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.सभेत जमा खर्चास मंजुरी, शाखा विस्तार,नवीन सभासदांना मान्यता,सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन,साहित्य पुरस्कार, राज्य कार्यकारी मंडळ सदस्य निवड या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राज्यस्तरीय प्रेम काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तरी सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक, सचिव सुनील गोसावी, प्रा. डॉ. अशोक कानडे, सुभाष सोनवणे,भगवान राऊत, भारत गाडेकर, राजेंद्र पवार, डॉ.तुकाराम गोंदकर, सुनील धस, राजेंद्र फंड,स्वाती ठुबे, अजयकुमार पवार, राजेंद्र चोभे यांनी केले आहे.