Home महाराष्ट्र गंगाखेड येथील आंबेडकरी अनुयायांनी नोंदविला निषेध

गंगाखेड येथील आंबेडकरी अनुयायांनी नोंदविला निषेध

29

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.21डिसेंबर):-देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या बद्दल समस्त आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या असून गंगाखेड येथील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला आहे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री यांच्याकडे केली आहे.

राज्य सभेमध्ये अधिवेशन सुरू असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे फॅशनच झाले आहे वारंवार आंबेडकर यांचे नाव काय घेता त्यांचे नाव घेण्यापेक्षा देवाचे नाव घेतले तर स्वर्ग मिळेल असे वक्तव्य केले होते या वक्तव्यामुळे समस्त आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून तात्काळ गृहमंत्री अमित शहा यांनी समस्त देशातील संविधान प्रेमी व आंबेडकरी अनुयायांची जाहीर माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दिलेल्या निवेदनावर लिंबाजी घोबाळे, प्रवीण घोबाळे, रणधीरराजे भालेराव, बाळासाहेब साळवे, भीमराव कांबळे, राहुल गायकवाड, श्रीकांत गायकवाड, शिदोधन भालेराव, बालासाहेब जंगले,नवनाथ साळवे, विकास रोडे, सुमित कामत, अमोल ढाकणे, माऊली साळवे, गुणवंत कांबळे, अशोक व्हावळे, रमेश जोंधळे, प्रा. आतीश खंदारे ,अतिश साळवे, रमेश वाघमारे, पंडितराव पारवे, प्रतीक साळवे, सिद्धार्थ कांबळे, दिगंबर घोबाळे ,विकास जाधव, अनिल मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here