✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855
पुसद(दि.21डिसेंबर):-शहरातील युवा ग्रामीण पत्रकार संघटनेत मागील काही काळापासून अस्थिरता निर्माण झाली होती, त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश जी कचकलवार साहेब यांनी अथक परिश्रम घेऊन अस्थिरता मिटवून संघटनेतील मनमिळाऊ स्वभावाचे,मेहनती व सतत संघटनेच्या प्रगतीचा विचार करणारे श्री. कुलदीप सुरोशे यांना युवा ग्रामीण पत्रकार संघ शाखा, पुसदच्या नवनियुक्त तालुकाध्यक्ष पदी नियुक्त केले.
यानंतर संघटनेबद्दल झालेल्या संपूर्ण अफवांना पूर्णविराम लागला व दि. 20/12/24. रोजी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश जी कचकलवार साहेब यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली अठवडी बाजार पुसद येथे संघटनेच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले..! हे विशेष
या उद्घाटन प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश जी कचकलवार साहेब तसेच जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे जी साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सोबतच संघटनेचे पुसद शाखेचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष कुलदीप सुरोशे तालुका उपाध्यक्ष विनोद कांबळे,शहराध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर,शहर उपाध्यक्ष मारोतराव कांबळे, तालुका सचिव सूर्यकांत राठोड, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ कदम, तालुका संघटक अनिल पवार,सदस्य बाबुराव देशमुख हे उपस्थित होते.यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश जी कचकलवार साहेब यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष कुलदीप सुरोशे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.