Home महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे तंत्र प्रदर्शनीचेयशस्वी आयोजन

औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे तंत्र प्रदर्शनीचेयशस्वी आयोजन

49

✒️अत्तदिप धुळे(विशेष प्रतिनिधी)मो:-9511953580

उमरखेड(दि.20डिसेंबर):-औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई व सहसंचालक प्रादेशिक कार्यालय अमरावती यांचे आदेशानुसार दिनांक 18/ 12 /24 रोजी संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सदर तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य श्री डी पी पवार ,प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डी आर तायडे गो.सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड ,श्री एकनाथजी पाटील प्रसिद्ध उद्योजक ,श्री गणेशजी शिंदे, रामेश्वर बिच्चेवार आय एम सी सदस्य तथा उद्योजक उमरखेड गटनदेशक श्री एस डी खुटाफले यांची प्रमुख उपस्थिती होती. तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक. गटनेदेशक श्री खुटाफळे सर यांनी केले व तंत्र प्रदर्शनाच्या आयोजनाची भूमिका विशद केली याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. तायडे सर यांनी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या आवड व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून उत्कृष्ट संशोधनाची निर्मिती होऊन यातुन उद्याचा भावी उद्योजक घडू शकतो.

प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःच्या व समाजाच्या विकास व प्रगतीसाठी हे संशोधन अविरतपणे सुरू ठेवावे यासाठी शुभेच्छा दिल्या व सहभागी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले .उमरखेड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक श्री एकनाथ जी पाटील साहेब यांनी प्रशिक्षणार्थ्यांना स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांना आकार देण्याची क्षमता विकसित करण्याबाबत मौलिक मार्गदर्शन केले . ग्रामीण भागातील युवकांमध्ये असलेली जिद्द व चिकाटी व मेहनतीस शासनाच्या उपक्रमाची जोड देऊन परिसरामध्ये यशस्वी उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी युवकांनी स्वयंप्रेरणेने पुढे यावे व यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देऊन प्रशिक्षणार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, श्री गणेश जी शिंदे यांनी “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या संदेशा प्रमाणे प्रशिक्षणार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन केले.

https://www.purogamisandesh.in/news/83019

रामेश्वरजी बीच्चेवार यांनी प्रशिक्षणार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये उद्योजक बनण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे प्राचार्य श्री डी पी पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये तंत्रप्रदर्शनमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या, मॉडेलच्या माध्यमातून जोपासलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे रूपांतर व्यवसायामध्ये करण्यासाठी शासनाच्या स्टार्टअप सारख्या योजनांचा फायदा घेऊन आत्मनिर्भर होण्यासाठी तसेच उद्याचे भावी उद्योजक बनण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक अभिनंदन केले .तंत्र प्रदर्शनामध्ये संस्थेतील विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या व पाहणी साठी ठेवलेल्या मॉडेल मधून इंजिनिअरिंग गटामधून प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक तसेच नॉन इंजीनियरिंग गटामधून प्रथम क्रमांक साठी निवड झालेल्या मॉडेलची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.

प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व मॉडेल्सला प्रोत्साहन पर प्रशस्तीपत्र देऊन सहभागी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले संस्थेतील ड्रेस मेकिंग व ब्युटी पार्लर व्यवसायातील महिला प्रशिक्षणार्थीं यांनी टाकाऊ पासून टिकाऊ अँड क्राफ्ट वस्तू तयार करून प्रदर्शनामध्ये पाहणी साठी सादर केल्या या सर्व महिला प्रशिक्षणार्थींचे विशेष कौतुक व अभिनंदन संस्थेच्या वतीने करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे शिल्प निदेशक श्री ए .डी. कुंभारे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री देशमुख सर यांनी केले सदर तंत्र प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील श्री साबळे सर ,परोपटे सर, निंबोळकर सर, कदम सर, शिंदे सर, चिंचाळे सर, नरवाडे सर ,भोसले सर, सोनुळे सर ,मयूर कुंभारे सर, नरवाडे मॅडम, निंबेकर मॅडम, धुळे मॅडम श्री इंगोले सर, गवई सर, थोंबाळे सर, श्री कांबळे, श्री धुळे ,गोदाजी पोपुलवाड तसेच संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थींनी अथक परिश्रम घेऊन सदर तंत्र प्रदर्शनी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here